top of page

नांदेडमध्ये भाजपाचा शंखनाद, अमित शहा यांची जाहिर सभा



आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिग्गज नेते यांच्या उपस्थितीत नांदेडच्या नवामोंढा मैदानामध्ये जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या सभेतून भाजप शंखनाद करणार असून मराठवाड्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.


स्थानकि स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांचे बिगूल वाजणार आहे. मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविण्यासाठी सर्व राजकिय नेते सक्रिय झाले आहेत. त्या अणुषंगाने येत्या सोमवारी नांदेडमध्ये भाजपची जाहिर सभा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप याच सभेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा शंखनाद करणार आहे.


अमित शहा तीन दिवस महाराष्ट्र दौर्‍यावर: 25,26 आणि 27 मे असे तीन दिवस गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीनंतर ते पहिल्यांदाच नांदेडला येत आहेत. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे आणि महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या उद्धटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत नवीन मोंढा मैदानावर भाजपची जाहीर सभा पार पडणार आहे.


भाजपकडून मोठी खेळी:

भाजपकडून या सभेला शंखनाद असं नाव देण्यात आल आहे. ऑपरेशन सिंदूरचे यश, सैन्याचा गौरव, विकसीत भारताचा शंखनाद असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांनी दिली. परंतु, या सभेच्या माध्यमातून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नविडणूकीचा शंखनाद करणार आहे. मराठवाड्यातील भाजप पदाधिकारी या सभेला हजेरी लावणार आहेत.दरम्यान, लोकसभा निवडणूकीत भाजपला मराठावाड्यात म्हणावं तसं याश मिळालेलं नाही.


मात्र, विधानसभा निवडणूकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका काबिज करण्याच्या तयारीत आहे. याच अनुषंगाने भाजपची जाहिर सभा पार पडत आहे. यात अनेकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत, परंतु त्याचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून अधिकृतपणे उलगडा करण्यात आला नाही. त्यामुळे या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍या निमित्त अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Comments


bottom of page