top of page

नागपूरमध्ये होणार फाल्कन 2000 ची निर्मिती - मुख्यमंत्री फडणवीस



पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्या फाल्कन 2000 जेट्सच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकराची प्रथमच ही निर्मिती होणार आहे. ही निर्मिती नागपूरात होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत या कराराचे स्वागत केले आहे.


नागपूर मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालणा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा बुस्ट मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्पपूर्ण पाऊल ठरेल. नागपूरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन 2000 ची संपूर्णत: निर्मिती आता नागपूरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपूरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे संटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन 8 एक्स आणि 6 एक्स ची असेम्ब्ली सुद्धा येथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडियास फाल्कन 2028 पर्यंत नागपूरात तयार होईल. 2017 मध्ये या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस ची स्थापना करण्यात आली होती.


आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपूरात रोजगार उपलब्ध होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणार्‍या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अग्रगण्या कंपनी आहे. आतापर्यंत कंपनीने 10 हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे 90 देशांना त्याचा पुरवठा केला जातो.

Comments


bottom of page