नार्कोटेस्टच काय, मेंदू काढून द्यायला तयार ; अमोल खुणेंचे दंंड थोपटत जरांगे पाटलांना आव्हान
- Navnath Yewale
- Feb 6
- 2 min read

अंबड: मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांनी गुरुवारी दि. 5 जालना पोलिस अधिक्षक यांची भेट घेतली. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणासह घातपात प्रकरणातील आरोपी अमोल खुणे यांच्यासह इतर दोघांची जामीन रद्द करुन सर्वांच्या नार्कोटेस्टची मागणी केली. जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर आज शुक्रवारी (दि.6) आमोल खुणे यांनी माध्यमांशी संवाद साधत जरांगे
पाटलांवर गंभीर आरोप करत दंड थोपटून आव्हान दिले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांनी जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांची भेट घेतली. कथित घातपात प्रकरणातील आरोपीं अमोल खुणे याच्यासह दादा गरुड, कांचन यांची जामिन रद्द करण्याचा अहवाल पोलिसांनी मा. न्यायालयासमोर मांडावा, माझ्यासह तीनही आरोपी व धनंज मुंडे यांची नार्कोटेस्टची मागणी करत त्यांनी आमदारधनंजय मुंडे, आमोल खुणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर आज आमोल खुणे यांनी माध्यमांशी संवाद साधत थेट दंड थोपटत जरांगे पाटील यांना आव्हान देत गंभीर आरोप केले आहेत. आमोल खुणे म्हणाले की, काल व्हायरल करण्यात आलेली रेकॉर्डिंग एक वर्षे जुनी आहे. माझ्या प्रकरणातून लक्ष विचलीत करण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. कालच माझ्याकडे एक माणुस पाठवला होता, अमोलला म्हणावं काही बोलू नको,कोणाचे फोन आले काय झालं हे ही सीडीआरमध्ये निघेल. तुम्ही म्हणताय यांच्या जामीना रद्द करा. सरकारने आता तुमच्याकडंच गृह खातं द्यायला पाहिजे. न्यायधीशही तुम्हीलाच केलं पाहिजे, तुम्ही काय सरकारचे जावाई आहात का?. माझ्या नादाला लागू नका मला तुमच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळचं माहित आहे.
उपोषण करणार्या माणसाच्या तोंडाला पाणी येईल का? तुम्ही तंबाखु खाऊन उपोषण करता त्याचे पुरावे, व्हिडीओ माझ्याकडे आहेत ते सुद्धा व्हायरल करेल असा इशाराही जरांगे पाटील यांना खुणे यांनी दिला. माझं कुटुंबीय प्रचंड दबावात आहे, मी तर विहीरीत पाय सोडले आहेत. काय दम असेल तर, मला खेटा पण माझ्या कुटुंबापर्यंत गेलात तर तुमचं काहीचं सगळंच बाहेर काढेल असंही अमोल खुणे म्हणाले. जामीन होऊनये म्हणून आमच्या वकिलांना मॅनेज करता. नर्कोटेस्टच काय मी मेंदूही काढून द्यायला तयार आहे. या उलट तुम्हीच आता चांगले ड्रायफ्रूट खाऊन तयार रहा नार्कोटेस्टला सामोरं जाण्यासाठी.
येत्या 19 फेब्रूवारीपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी नार्कोटेस्टच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहे. तेव्हा कळेल संगळ येईल बाहेर. कोपर्डी प्रकरणा पूर्वी गुनरत्न सदावर्ते यांना मारहाण करण्याचा प्लॅन होता. पण मुंबई शहरात हे शक्य नसल्याने कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कोर्टात मारहाण केल्याचा खुलासाही अमोल खुणे यांनी केला. कोपर्डी प्रकणामध्ये शिवबा संघटनेचे संस्थापक म्हणून विविध चॅनलला दिलेल्या जरांगे पाटलांच्या बाईटही खुणे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवल्या. उपोषणाला बसल्यानंतर तुमची शिवबा संघटना कुठे गेली, त्यावेळेस आम्हाला भाऊ म्हणालात कधीही साथ सोडणार नाही असे ठणकावून सांगत होता आता कुठं गेली शिवबा संघटना. असा अन्याय करू नका, औरंगजेबासारखं वागू नका. मावळे तुम्हीच संपवले आहेत. तुमच्यावर संस्कार नाहीत असा घनाघातही आमोल खुणे यांनी केला.
महागडे आयफोन कोठून आले: वकील मॅनेज करायला पैसे नाहीत म्हणता आणि मुलांकड, बायकोकडं दिड दिड लाखांचे आयफोन कुठून आले. सगळ माहित आहे नादी लागू नका असा इशाराही खुणे यांनी दिला.
बनावट दारु विक्रीसाठी घेतलेले पैसे परत दिले नाहीत: मी दारु पिऊन कुटुंबीयांना त्रास देतो, पत्नी आणि माऊली (आई) कडे पाहून शांत होतो म्हणता, तुम्ही काय केलं, बनावट दारु विक्रीच्या व्यवसायासाठी मी माझ्या मित्राकडून एक लाख रुपये तुम्हाला घेवून दिले होते ते परत दिले नाहीत तुम्ही असा अरोपही युणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला.



Comments