नाशिकमध्ये अनाधिकृत सातपीर दर्गा रातोरात हटवला;
- Navnath Yewale
- Apr 16
- 2 min read
जमावकडून पोलिसांवर तुफान दगडफेक, 4 अधिकारी, 11 कर्मचारी जखमी; जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर, काठे गल्ली परिसरात ताणवपूर्ण शांतता.

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनाधिकृत दर्गा काढण्याचे काम मध्यरा़त्रीपासून सुरू करण्यात आले. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकिय अधिकार्यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणेची संयुक्तपणे मध्यरा़त्रीच्या सुमरास कारवाईला सुरवात झाली.
शहरातील काठे गल्लीतील दर्गा हटविण्याच्या कारवाईला मध्यरात्री सुरवात होताच, अचानक एका बाजून जमाव काठे गल्लीच्या दिशेने आला. कारवाईला विरोध करत संतप्त जामावाने पोलिस कर्मचारी, अधिकारी आणि पोलिस वाहनांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यात चार अधिकारी आणि सुमारे 11 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.यानंतर जमावाला पांगविण्यासाठी प्रशासनाकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला. काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पहाटे साडेपाच पासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. सकाळ पासून अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. मध्यरात्री पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर परिसरात तणापूर्ण शांतता आहे. अतिक्रमण जवळपास जमिनीदोस्त करण्यात आले आहे. बांधकामचे डिसमेंटल साहित्य हटविण्याचे काम सध्या सुरू आहे.
काठे गल्ली परिसरात अनाधिकृत दर्गा टविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांच्याा वतिने आंदोलन करण्यात आले होते. वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात या संदर्भात सुनवणी झाली, उच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टला दर्गा बाबतीत काही पुरावे सादर करता आले नसल्याने मनपाने दर्गा अनाधिकृत ठरवून 15 दिवसाच्या आत अनाधिकृत दर्गा काढण्याची नोटीस बजावली होती. सध्या परिसरात तणापूर्ण शांतता असून या मार्गावरील वाहतूक पुढील तिन दिवस बंद ठेवण्यात आली आहे तर बंदोबस्त कायम राहणार आहे.
नेमक काय घडलं?
नाशिक पोलिसांनी 15 दिवसापूर्वी सातपीर दर्ग्याचे बांधकाम हटविण्याची नोटीस बजावली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि महानगरपालिकेकडून मंगळवारी मध्यरात्री 2:30 च्या सुमारास दर्गा हटविण्याची संयुक्तीक कारवाई हाती घेण्यात आली. तत्पूर्वी दर्गा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला, दर्ग्यातील धर्मगुरु आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली.
त्यानंतर पहाटे साडे पाच वाजता अनाधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली. मात्र, दिड ते दोन वाजता अचनाक एक जमाव कारवाईच्या ठिकाणी आला. जमावाने बंदोबस्तात तैनातीत असलेल्या पोलिसांवर अचनक तुफान दगडफेक सुरू केली, यामध्ये पोलिस कर्मचार्यांच्या हात-पाय, डोक्याला जखमा झाल्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.
आज सकाळपासून येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. हा परिसर पूर्णपणे निर्मणुष्य करण्यात आला आहे. तसेच काठे गल्ली भागातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. सातपीर दर्ग्याचे अनाधिकृत बांधकाम 90 टक्के हटविण्यात आले आहे. आता केवळ लोखंडी भाग हटवण्याचे काम बाकी आहे. नाशिक महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर या दर्ग्याच्या बांधकामाचा राडारोडा बुलडोझरच्या साह्याने हटवला जात आहे. सध्या काठे गल्ली भागात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काठे गल्ली-भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतरत्र मार्गाने वळविण्यात आली आहे.
Comments