नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण; दिपाली पाठोपाठ संदीप गायकवाडही लॉजवर
- Navnath Yewale
- Dec 6, 2025
- 1 min read

आहिल्यानगर/ जामखेड: कल्याण येथील मूळ रहीवाशी नृत्यांगना दिपाली पाटील हिने जामखेड येथील साईलॉजवर गळफास घेवून आत्महत्य केली. या प्रकरणी दिपालीच्या कुटुंबीयांनी भाजपचा नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नगरसेवक संदीप गायकवाड यास अटक केली असून दिपालीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासामध्ये दिपालीच्या मृत्यूआधी तिच्या सोबत संदीप गायकवाडही साई लॉजवर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास दिपाली पाटील साई लॉजवर पोहोचली होती. तिच्या पाठोपाठ संदीप गायकवाड हा देखील त्या लॉजवर पोहोचला होता. तो दिपालीच्या रुममध्ये जात असल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. दिपालीने आत्महत्या करण्यापूर्वी संदीप देखील त्या लॉजवर पोहोचला होता. त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं? याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, संदीपने दिपालीला काही त्रास दिला आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत.
दिपाली पाटील हिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून जामखेड पोलिस ठाण्यात संदीप सुरेश गायकवाड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपालीचे आई-वडिल तसेच नातेवाईक हे कल्याण (जि. ठाणे) येथील रहीवाशी आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर दिपालीचा मृतदेह पुढील विधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिचे अंत्यसंस्कार कल्याण येथे करण्यात आले. या ह्रदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दिपाली काही मैत्रिणींसोबत जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली होती. परंतु काही तास उलटून गेल्यावरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी तिला शोधायला सुरुवात केली. दिपाली ज्या रिक्षाने लॉजवर गेली होती त्या रिक्षा चालकाची चौकशी केली असता ती लॉजवर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे समोर आले होते.



Comments