पंचवीस कोटी आणि विधानपरिषदेची ऑफर ठोकरली, मैत्री तेव्हाच संपली; मला मारण्यासाठी गुंड पाठवले, माझ्याकडं रेकॉर्डिंग, गंगाधार काळकुटेंचे धनंजय मुंडेवर पलटवार
- Navnath Yewale
- Nov 9, 2025
- 2 min read

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचे नाव काल आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घतले. काळकुटे काझा चांगला मित्र आहे. तो माझ्याकडे आठ आठ तास कशासाठी थांबत होता? बीडमधून लोकसभेसाठी त्याने अर्ज भरला असे सांगून मुंडे यांनी काही दावे केले होते. त्यानंतर गंगाधर काळकुटे यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना माझा मित्र म्हणून उल्लेख केला. मला समाजात बदनाक करण्याचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यापासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
माझ्या बाबत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न मी हाणून पाडणार, असे म्हणत काळकुटे यांनी अनेक दावे, खुलासे केले. लोकसभा निवडणुकीत लोकशाहीने दिलेल्या अधिकारातून आपण उमेदवारी अर्ज भरला होता. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर आपण माघार घेतली. धनंजय मुंडे यांनी मी माघार घेऊ नये म्हणून पंचवीस कोटी रुपये आणि विधान परिषदेवर आमदार करण्याची ऑफर मला दिली होती. पण ती ऑफर आपण धुडकावून लावली, असा दावा काळकुटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
धनंजय मुंडे यांच्यासोबत आपली मैत्री होती, पण जेव्हा त्यांच्या वाल्मिक कराडने संतोष आण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या केली, त्या दिवशीपासून आमची मैत्री तुटल्याचे काळकुटे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या भल्यासाठी, आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालो, मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत गेलो म्हणून संतोष देशमुख यांच्याप्रमाणे माझीही हत्या करणार होते, पण वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यामुळे मी वाचलो. मला संपवण्याचे प्रयत्न यापुढेही केले जाऊ शकतात, माझ्या जीवाला धोका आहे. पण मी घाबरत नाही, असे सांगत काळकुटे यांनी आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगितले.
मुंडे यांनी माझ्या रेकॉर्डिंग असल्याचा दावा काल केला, त्यांच्याकडे आहे, तशा आमच्याकडेही त्यांच्या आहेत. योग्यवेळ आली की आम्हीही त्या समोर आणू, असे म्हणत काळकुटे यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. माझ्याबद्दल मनोज जरांगे व समाजामध्ये धनंजय मुंडे यांनी संभ्रम निर्माण केला आहे. संताष देशमुख यांच्या खुनानंतर तुमची आणि माझी मैत्री संपली. देशमुख यांच्यानंतर माझा नंबर आकाने (वाल्मिक कराड) लावला होता. त्याचे रेकॉर्डिंग आणि पुरावे माझ्याकडे आहेत. जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून आपण लोकसभेतून माघार घेतली असेही काळकुटे म्हणाले.
लोकसभेेवेळी आपल्या भावाला दिलेल्या निरोपाचे रेकॉर्डिंग आपण ऐकवणार असून आपण ऑफर नाकरल्याने मला डुकरासारखं ओढून नेतो असं तुमचे लोक म्हणाले होते. ओबीसी सभेत सुतळी बॉम्ब टाकून मला अडकवायचं ठरवलं होतं. आपण आणलेली कामे वाल्मिक कराडने आडवली, असा आरोपही काळकुटे यांनी केला. संतोष देशमुख प्रकरण आणि महादेव मुंडे प्रकरणात आम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लोकांनी धमक्या दिल्या.
तुम्ही मित्र म्हणण्याच्या पुढे गेले आहात. मला मित्र म्हणून संभ्रम निर्माण करु नका. माझी आणि तुमची भेट झाली, असेही त्यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हटले. सभेनंतर मुंडेंचे अनेक फोन आल्याचे रेकॉर्डिंग आहेत. मनोज जरांगे व माझ्या खुनाचा प्रयत्न केला. मला मारण्यासाठी तुमच्या लोकांनी गुंड पाठवले, असा आरोपही काळकुटे यांनी पत्रकार परिषदेत केला.



Comments