top of page

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद: मुख्यमंत्री फडणवीसांची विधानभवनात ‘रॉयल एंन्ट्री’विरोधकांची खोचक टीका अन् कायद्यावर बोट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बुधवारी केवळ 2 गाड्या घेऊन घराबाहेर पडले होते. तर, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही आज पालखी मार्गावर चक्क बसने प्रवास केला. तसेच, आपल्या ताफ्यातील 50 टक्के गाड्या कमी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चक्क बुलेटवरुन प्रवास केला. विधानभवनात येताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत दुचाकी गाड्यांचा कमी ताफा दिसून आला. मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरुन आता विरोधकांनी टीका सुरू केली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्याव बुलेटची पीयुसीची देखील मुदत संपल्याचं काँग्रेसने समोर आणलं आहे.


मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी थेट दुचाकीवरून विधानभवन गाठल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेचद देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले. मुख्यमंत्री फडणवीस स्वत: रॉयल एनफिल्ड 350 ही बाईक चालवत विधान भवनात दाखल झाले. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरुन आता राजकारण तापलं आहे.


दरम्यान, काँग्रेस नेत्या तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीतील चूक शोधून काढली कारण, मुख्यमंत्र्यांनी जी बुलेटट विधानभवनात येण्यासाठी वापरली होती, त्या बुलेटची पीयुसीची मुदत संपल्याचं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधीवर टीका करताना, एक्सायरड माल अशा शब्दात राहुल गांधी हे राजकारणातील एक्सपायरडं माल असल्याचं म्हटलं होतं. आता वर्षा गायकवाड यांनीही तोच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाना साधला. विधानभवनात येण्यासाठी वापरलेल्या बुलेटची पीयुसी एक्स्पायर झाली होती, त्याच अनुषंगाने तर ‘एक्स्पायर माल’ चालतं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साधनेसाठी, स्टंटासाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे पीयूसी मुदतबाह्य झालेलं होतंश, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रेही शेअर केली आहेत.


आमदार रोहित पवार यांची खोचक टीका: पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी आपला ताफा कमी केला ही स्वागतार्हच बाब आहे, परंतु त्यांची सुरक्षाही तवेढीच महत्वाची असते. त्यामुळे ताफा कमी करताना सुरक्षेशी तडजोड होणार नाही याची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. राहिला विषय मंत्र्यांचा, तर मंत्र्यांना तसंही फार आधिकार नाहीत. त्यामुळे मंत्री आणि अधिकारी यांचे ताफे कमी केलेच पाहिजेत आणि खर्‍या अर्थाने काटकसर करायचीच असेल आणि जनतेचा पैसा वाचवायचा असेल तर शेतकर्‍याचा विरोध असलेला 1 लाख कोटींचा शक्तिपीठ महामार्ग, ज्यामध्ये 30,000 कोटींची दलाली खाल्ली जाणार आहे तो त्वरीत रद्द करावा. याशिवाय बुलेट ट्रेन सारखे पांढरे हत्ती असलेले गुजरात हिताचे प्रकल्पही थांबवावेत, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. छोट्या-छोट्या गोष्टीत सरकारची स्टंटबाजी बधितली तर ‘ न्हानीला घातला बोळा अन दरवाजा ठेवला मोकळा’ या म्हणीप्रमाणे आज सरकाची अवस्था झाल्यासारखं दिसतंय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Comments


bottom of page