... पण ही दहशत कुणाची आहे, वर्दीला पण कोणी घाबरत नाही
- Navnath Yewale
- Apr 20
- 2 min read
बीड मध्ये नक्की काय चाललंय हा एक मोठा प्रश्न आहे. एवढ सगळं झालं तरी बीड मध्ये बदल होताना दिसत नसल्याच्या संतप्त भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

संतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर बीड जिल्हा गेल्या चार महिण्यापासून सातत्याने क्राईमच्या बाबतीत चर्चेत आहे. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येतील एकून मारेकर्यां पैकी कृष्णा अंधळे अद्याप फरार आहे. त्यानंतर कृष्णा अंधळे च्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवून वाल्मिक कराडचे व्हिडीओ पाहिले म्हणून धारुर तालुक्यातील एका होमगार्डला गंभीर मारहाण, त्यानंतर एका पाठोपाठ एक मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओने तर खळबळ उडवून दिली.
उसतोडणीच्या कारणावरुन परळी तालुक्यातील एकाची कर्णाटकमध्ये हत्या. आंबाजोगाई ग्रामीण रुग्णालया समोर किरकोळ कारणावरुन एकावर कोयत्याने वार करुन प्राणघातक हल्ला. माजलगाव शहरात भाजप कार्यकर्त्याची भर रसत्यात कोयत्याने सपासप वार करुन हत्या, आंबाजोगाई तालुक्यात एका महिला वकिलास दहा जणांकडून गंभीर मारहाण, हे प्रकरण ताजे असतानाच आता महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेडछाडीला कंटाळून मामाच्या घरी गळफास घेवून आत्महत्या. हि सर्व प्रकरणे गेल्या चार महिण्यातील आहेत.
उपमुख्यमं़त्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्या नंतर परिस्थिती निवळेल असंच काहीसं बीड वासीयांना वाटलं होतं. पण काही अंशी फरक जानवत असला तरी नुकत्याच एका चालकाच्या अपहरणाचा प्रकार समोर आला आहे. बीड घटनेत कुणाचीही मुलाहिजा राखू नका अशा सक्त सूचना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांनी बीड पोलिसांना दिल्या आहेत. त्यातच आता सुप्रिया सुळेंनी चालकाच्या अपहरणाचा नवा मुद्दा समोर आणत बीडच्या दहशतीवरुन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे.
खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या
बीडमधील महाविद्यालयीन विद्यार्थीणीने मामाच्या घरी शनिवारी (19 एप्रील) आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्या विद्यार्थीणीचे लग्न जवळ आले होते. या घटनेवरुन माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, बीड मध्ये नक्की काय चाललंय हा एक मोठा प्रश्न आहे, एवढं सगळं झाल तरी बीडमध्ये बदल होताना दिसत नाही. कालच मी बीडच्या एसपींसी दोन केस बद्दल बोलले. कालच माझ्याकडे आणखी एक किडनॅपिंगची केस आली आहे, आई- वडिलांना पण माहित नाही तो मणुष्य कुठे आहे.
तो एक चालक (ड्रायव्हर) आहे, माझ्याकडे लोक मदतीला आले की, आमच्या घरातला मुलगा ड्रायव्हर आहे. त्याला किडनॅप करुन कोणीतरी नेलंय. याप्रकरणांचीही मी काला एसपींना बोलून याची माहिती घेतली, ‘पण ही दहशत कोणाची आहे, त्या बीड मध्ये, की वर्दीला पण घाबरत नाही’ यावर तातडीने एक मिटींग खरंतर जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे की त्यांनी फार गांभीर्याने घेतलं पाहिजे.
Comments