top of page

परळी औंष्णिक केंद्रात अखेर बाहेरच्यांनी राख उचचली वाल्मिक कराडची मोनोपॉली असलेल्या परळीत पोलिस बंदोबस्तात राखेचा उपसा




सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचे अर्थकारण समोर आले. वाल्मिक कराडची दहशत परळी औंष्णिक विद्यूत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परळीच्य औंष्णिक विद्यूत केंद्राची दाऊदपुरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैंसे देऊन घेता येणार आहे. गेली काही महिण्यांपासून दाऊदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मीतीने निविदा प्रक्रिया पार पाडली.


निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदा धारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे परळीतील राख माफियांना आता लगाम बसणार आहे. दाऊदपूर येथील तलावतून आता पोलिस बंदोस्तात राख उपसा सुरु करण्यात आला आहे. राख उपसा करण्यासाठी आवश्यक असणारी पोकलेन मशीन यंत्रणा बंधार्‍यात निविदाधारक एजन्सी चालकाकडून सोडण्यात आली.


पैंसे दूेऊन राख खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली असून या बाबात परळी औंष्णिक विद्यूत केंद्राचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील इंगळे यांनी या प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे.


बीडच्या मस्साजोगमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खंडणी, सत्ता, खुन, पैंसा या सगळ्या प्रकरणांवरुन बीड धगधगत आहे. या सर्व प्रकरणांचा धागा येऊन थांबतो राखेपर्यंत आता शुल्क भरुन अधिकृत पाँड राख उचलण्यास पात्र 16 निविदाधारक एजन्सीना मंजुरी देण्यात आली आहे. 21 पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये आणि परळी औंष्णिक विद्युत केंद्राच्या 30 अधिकार्‍यांच्या उपस्थितीत नवीन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

नक्की काय प्रकार?


परळी तालुक्यातील दाऊदपूर दादाहरी वडगाव परिसरात महाजनको नवीन औंष्णिक विद्युत केंद्र आहे. इथे 250 मेगावॅट क्षमतेचे तीन संच सुरू आहेत. एकून 750 मेगावॅट वीज निर्मीती केली जाते. या विज निर्मीती प्रक्रियेत कोळसा जळल्यावर राख तयार होते. ही राख दोन प्रकारांची असते एम म्हणजे पाँड राख, जी जड असते आणि ती दाऊतपूर येथील राख बंधार्‍यात सोडली जाते.दुसरी म्हणजे फ्लाय राख, जी बंकरमधून उचलून नेली जाते पाँड राख विभट्टीसाठी वापरली जाते.


ती बीड, लातूर, परभणी जिल्ह्यांत पाठवली जाते. दाऊदपूर आणि आसपासच्या परिसरातील समारे 150 प्रकल्पग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. ही राख आधी नागरिकांना उचलू दिली जायची नाही. राखेचे प्रदूूषण आम्ही सहन करतो यासाठी आम्हाला राख देण्यात यावी अशी मागणी दाऊतपूरच्या गावकर्‍यांनी केली होती. त्यानंतर राखेसाठी अधिकृत निविदा प्रक्रिया पार पडली. यातून 16 पात्र निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून पैंसे देऊन आता दाऊदपूरच्या तलावातील राख उचलता येणार आहे.



राखेच्या वाहतूकीची प्रक्रिया काय?

राखीची प्रक्रिया मिनिस्टरी ऑफ एन्व्हायरमेट दिल्लीतून होते. राखेचं टेंडरिंग या महाजनको यांनी दिलेल्या नियमाप्रमाणे करण्यात येते पौंड राख टेंडरची प्रक्रिया आम्ही दोन तारखेपासून (2 एप्रील) सुरू केली आहे. राखेच्या तळ्यात सध्या वीस पोकलेन मशीनद्वारे राख काढून ती हायवाद्वारे काढली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे राखेेची वाहतूक केली जात आहे. राखेच्या वाहतूकीसाठी 400 जीएसएम च्या कापड राखेवर झाकून हे गोण बाहेर काढली जातील.


हायवा मध्ये राख भरताना ती पूर्ण भरू नये अशा देखील सूचना करण्यात आल्या आहेत. आरटीओ चे सर्व नियम पाळले पाहिजेत असे आम्ही त्यांच्याकडून लेखी घेतले आहे. यासर्व गोष्टीचे पालन करुन राखेची वाहतूक केली जात आहे. राखेचे प्रदूषण आम्ही सहन करतो यासाठी आम्हाला राख देण्यात यावी अशी मागणी दाऊतपूरच्या गावकर्‍यांनी केली होती. या नंतर गावकर्‍यांना 28 हजार मॅटरिक टन चा साठा 72 हजार मीटर पर्यंत वाढवून दिला.


हे त्यांना आम्ही केवळ शंभर रुपये प्रति टन देत आहेत. पौंड राखेची प्रक्रिया दाऊतपूर ग्रामस्थांच्या सहार्याने पार पडली. 20 टक्के कोट्यातला राखेसाठी दोन तारखेला आम्ही निविदा प्रक्रिया पूर्ण पार पडली. यावेळी आता आलेल्या आर्जांची छाननी सुरू आहे. यातून महानिर्मीती आणि सरकारला महसूल मिळावा असा आमचा प्रयत्न आहे असे परळी औंष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील इंगळे यांनी सांगतिले. दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैंठकीत राखेच्या वाहतूकीचा कोणाला त्रास होऊ नये असे सांगितले होते त्या प्रमाणेच काम केले जात आहे.

Comments


bottom of page