top of page

परळ स्थानकावर फास्ट लोकल थांबणार!

हालचालींना वगे कॅबिनेट मंत्र्यांनी दिले संकेत

ree

मुंबई दादर रेल्वे स्थानकावर लोकलसाठी गर्दी काही केल्या कमी होत नाही. सकाळ असो वा संध्याकाळ असो, दादर स्थानकिावर प्रचंड गर्दी असते. लांबपल्याच्या गाड्या आणि लोकलमुळे गर्दी वाढतच चालली आहे त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला पर्यायी स्थानक म्हणून परळ स्थानकाचा प्रस्ताव समोर आला होता. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कार्पोरेट कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसंच या भागात अनेक मोठी हांस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा, अशी जनतेची मागणी असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरवा करू असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.


मुंबई महापालिकेतल्या एफ दक्षिण विभाग कार्यालया जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कौशल्य, रेाजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसंच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा यासाठी मंगलप्रभात लोढा आता पुढाकार घेणार आहेत.


जनेतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्अ केलं. जनता दरबाराच्या माध्यमाने जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचे समाधान हाईपर्यंत कार्यरत राहून लोकशाही अधिक बळकट करू, असेही मंत्री लोढा म्हणाले.

Comments


bottom of page