top of page

पहलगाम नंतर काश्मीर खोर्‍यात पुन्हा थरार; कुपवाडात दहशतवादी हल्ला?, घरात घुसून एकावर गोळ्या झाडल्या




जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रील रोजी दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला चार दिवस लोटले आहेत. पहलगाम हल्ल्या नंतर भारतीय यंत्रणा सज्ज असतानाच आता कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी सदृश्य हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी काही अज्ञातांनी घरात घुसून एका नागकिाची गोळ्या झाडून हत्या केली आहे.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकाना जीव गमवावा लागला. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली असून दहशतवादा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर काश्मीर खोर्‍यात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत. गेल्या 24 तासात काश्मीर खोर्‍यात सक्रिय दहशतवाद्यांची आणखी चार घरं उडवून दिल्यानंतर कुपवाडामध्ये आता आणखी उक हत्याकांड झाले आहे.


जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काही अज्ञातांनी घरात घुसून एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या हल्ल्यात मयत झालेला व्यक्ती सामान्य नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीचा भाऊ काही दिवसापूर्वी पाकिस्तानला गेला होता. तो लष्करात सामील असल्याची माहितीही समोर येत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत बंदूकधार्‍यांनी शनिवारी रात्री उशीरा गुलाम रसुल मगरे (वय 45) याच्यावर त्याच्या घरात घुसून बेछूट गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.


मयताचा भाऊ पाकव्याप्त काश्मीरमध्ये

या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीर खोर्‍यात संयुक्त सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम सुरू केली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या हत्तेमागचा हेतु स्पष्ठ नसला तरी सुरक्षारक्षांनी सांगिल्याप्रमाणे मयत गुलाम रसूल मगरे चा भाऊ नियंत्रण रेषेच्या पलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो. मोहिद्दीन हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी गटामध्ये सक्रिय असल्याची खात्रीलायक माहिती आहे.


दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

या आठवड्यात सुरुवातीला पहलगाम हल्ल्याच्या पाश्वभूमिवर सुरक्षा दलाने काश्मीरमध्ये अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. दरम्यान, कुपवाडा येथे एका नगारिकाची हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षकांनी सुरू केलेल्या या कारवाईत किमान 9 अतिरेक्यांची घरे स्फोटकांचा वापर करून उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. शिवाय शेकडो संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.


शनिवारी संध्याकाळपासून या कारवाई अंतर्गतच आणखी 3 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. यात दहशतवाद्यांच्या घरांना उडवून देण्यात आले. यात झेना पुरा सोफीयान येथील अदनान सफीदार बांधीपुरा येथील जामीन अहमद शीर गोजरी आणि पुलवामाच्या त्राल येथील अमीर नजीरवाणी या दहशतवाद्यांचा समावे आहे.

Comments


bottom of page