top of page

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अनंतनागमध्ये लपले !

तपास यत्रणांचे सर्च ऑपरेशन सुरू; दहशतवाद्याची ओळख पटली




पहलगाममध्ये दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळ—— देशभरात खळबळ उडाली आहे. या दहशतवादी हल्ल्याला सात दिवस उलटले असले तरी भारत -पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे. दूसरीकडे लष्कर, काश्मीर पोलिस, एनआयए यांची शोधपथकं हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी काश्मीर पिंजून काढत आहेत. हे दशहतवादी अनंतनागमध्ये लपल्याचे बोलले जात असून तिथे शोधमोहिम सुरू आहे.


दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी दिड वर्षापूर्वीच भारतात दाखल झाल्याचे समोर आलं आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी दिड वर्षापूर्वीच पाकिस्तानमधून भारतात दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासह इतरही काही घुसखोर भारतीय हद्दीत दाखल झाले होते. सीमेवरील सांबा-कथुआ भागात तारांचे कुंपण तोडून हे सर्व दहशतवादी भारतीय हद्दीत आले होते. तेव्हापासून भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


घुसखोरीची चौकशी पण...

दिड वर्षापूर्वी झालेल्या या घुसखोरीची चौकशी झाली होती आणि त्यासंदर्भात सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचं केंद्रीय गृहमंत्रालयाशी बोलणंही झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे.


दहशतवादी अनंतनागमध्ये लपले?

पहलगाममध्ये हल्ला केलेले दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याचा संशय तपास पथकांना आहे. अनंतनागच्या वरच्या भागात हे दशहवादी लपले असून त्यांच्या शोधासाठी लष्कर, रष्ट्रीय रायफल्स व निमलष्करी दलाकडून स्थानिकांची मदत घेतली जात आहे . शिवाय जम्मू काश्मीर पोलिसांकडून यासाठी तंत्रज्ञानाचीही मतद घेतली जात आहे. पहलगाममध्ये हल्ला करणार्‍या देान दहशतवाद्यांंची नावं अली भाई उर्फ तल्हा आणि हाशीम मुसा उर्फ सुलेमान अशी आहेत. लष्कर ए तैय्यबाचा दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याचंही रेखाटन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शिवाय त्यांची माहिती देणार्‍यास 20 लाखांचा इनामही पोलिसांनी जाहिर केला आहे. यापैकी मुसा हा गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी सोनमार्गमध्ये झालेल्या झेड- मोर्ह भुयार स्फोट

प्रकरणातील संशयित आहे.


अशी पटली दहशतवाद्यांची ओळख

पहलगाम येथे हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक बाबींचा वापर केला. त्यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, पर्यटकांनी व स्थानिक गाईडनी काढलेेले घटनेचे व्हिडिओ आणि सुरक्षा पथकांकडे खोर्‍यातील दहशतवाद्यांची असलेली माहिती यांची सांगड घातल्यानंतर या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे .


“ पहलगाम घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना दहशतवाद्यांचे अनेक फोटो दाखवण्यात आले. त्यातल्या एका फोटोमध्ये त्यांनी मुसाला ओळखलं. तिथून इतर दहशतवाद्यांची ओळख देखील पटली” अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली. मुसाला ओळखलं. मुसाचा फोटो तपास पथकांना दहशतवादी जुनैद अहमद भटच्या मोबाईल फोनमध्ये सापडला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दाचीगम जंगलात झालेल्या चकमकीत भट मारला गेला होता. त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू व फोटोंच्या आधारे दहशतवादी मुसाची ओळख पटली.

Comments


bottom of page