top of page

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा चेन्नईमधून श्रीलंकेला पळण्याचा प्रयत्न? कोलंबो विमानतळावर विमानाची कसून तपासणी




जम्मू काश्मीरच्य पहलगाममध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला. दरम्यान या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत जम्मू-काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. याचदरम्यान गुप्तचर यंत्रणेला अशी महिती मिळाली होती की, या हल्ल्याशी संबंधीत काही संशयित दहशतवादी चेन्नईवरुन कोलंबोला पळण्याच्या तयारीमध्ये आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चेन्नईवरुन कोलंबोकडे रवाना झालेल्या श्रीलंका एअरलाईन्सची प्लाईट यूएल 122 या विमानाची कोलंबोच्या भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा दलाकडून तपासणी करण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणेला अशी माहिती मिळाली होती की, या हल्ल्याशी संबंधित काही संशयित दहशतवादी चेन्नईवरुन कोलंबोला पळण्याच्या तयारीमध्ये आहेत. माहिती मिळाल्यानंतर लगेचच कोलंबोच्या भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनला अलर्ट करण्यात आलं होतं. विमान विमानतळावर पोहोचताच या विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यात आली.


श्रीलंकेच्या पोलिस प्रवक्त्यानं याबाबत महिती देताना सांगितलं की, आम्हाला अशी माहिती मिळाली होती की, चेन्नईवरुन कोलंबोला येणार्‍या विमानाने पहलगाम हल्ल्याशी संबंधित काही दहशतवादी देखील आहेत. त्यांनतर आम्ही या विमानातील प्रवाशांची तपासणी केली. त्यानंतर या विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.


पहलागाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आता मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानसोबत सुरू असलेली सर्व प्रकारची आयात-निर्यात बंद करण्यात आली आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचा आदेश देण्या आला आहे.


पाकिस्तानची आगपाखड:

भारतानं केलेल्या या कारवाईनंतर आता पाकिस्तानची चांगलीच आगपाखड झाली आहे. पाकिस्तानच्या नेत्यांकडून विखारी वक्तव्या सुरू आहेत. युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आता त्याच्या मित्र राष्ट्रांची मदत घेण्याच्या तयारीमध्ये आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांना केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला आहे.

Comments


bottom of page