top of page

पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी घेरले, एकास कंठस्नानभारतीय सुरक्षादलाचे सर्च ऑपरेशन; जम्मू काश्मीरच्या सोफियामध्ये चकमक




पहलगाम हल्ल्यातील कमांडो दर्जाच्या दोन दहशतवाद्यांना आज जम्मू काश्मीरच्या शोफियामध्ये भारतीय सुरक्षादलाने घेरले. प्राप्त माहितीनुसार एका दहशवाद्याला कंठस्नान घातले असून दुसर्‍या दहशतवाद्या सोबत सुरक्षदलाची चकमक सुरू आहे.




पहलगाम हल्ल्या नंतर भारतीय सुरक्षाबलाने जम्मु काश्मीमध्ये दहशतवाद्याच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम फत्ते केली. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हल्ला चढवून भारतीय लष्कराने शकडो दहशवाद्यांचा खातमा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (12 मे) रोजी दहशतवाद्यांना संपवून टाकू, अण्वस्त्रांच्या धमकीला भारत भिक घालणार नाही असे ठणाकावून सांगितले होते.


त्यातच आज सुरक्षादलाने जम्मू काश्मीरमधे शोध मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांना घेरलं आणि एका दहशतवाद्यास कंठस्नान घातलं असून दुसर्‍या दहशवाद्याशी चकमक सुरू असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर सुरक्षादलाची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.

पहलगाम हल्ल्यातील कमांडे दर्जाचे दोन दहशतवादी जम्मूच्या सोफिया मधे दडल्याची माहिती मिळताच सुरक्षादलाने परिसरता सर्च ऑपरेशन सुरू केले.



दरम्यान, सुरक्षदलाने सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून या दोन्ही अतिरेक्यांना सोफियाच्या जंगलात घेरले. अतिरेक्यानी सुरक्षादलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. मात्र, सुरक्षादलाच्या जवानांनी एकास कंठस्नान घातले तर दुसर्‍या आतंकवाद्या सोबत चकमक सुरू असल्याची माहिती आहे. लवकरच त्याचाही खात्मा झाल्याचे वृत्त मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षादलांच्या जवानांनी या अतिरेक्यास चोहोबाजूने घेराबंदी केली असून अतिरेक्याला सुरक्षादलाचे कवच भेदन शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

Comments


bottom of page