top of page

पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटन थांबले; नोकर्‍या उद्ध्वस्त, स्थानिक लोक अडचणीत...



पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला एक महिना झाला आहे. या घटनेनंतर भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आणि‘ ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या लष्करी कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आणि शेकडो दहशतवादी ठार केले. दुसरीकडे दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पहलगाममध्ये जी ठिकाणं पर्यटकांनी गजबजलेली असत तिथे आता पूर्वीपेक्षा खूपच कमी पर्यटक येत आहेत. यामुळे पहलगाममध्ये पर्यटकांवर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवन धोक्यात आले आहे आणि त्यांचे जीवन अडचणीतून जात आहे.

पर्यटन ठप्प नोकर्‍या बुडाल्या:

पहलगाम आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता आहे. कारण पर्यटकांनी येथे येणे जवळजवळ बंद केले आहे. टूर ऑपरेटर नसीर अहमद म्हणाले की, हे ठिकाण निर्जन दिसते. पूर्वी, हजारो पर्यटक कोणत्याही दिवशी पहलगामला भेट देत असत, ज्यामुळे दुकानदार, रस्त्याच्या कडेला विक्रेते, घोडेस्वार, टॅक्सी चालक आणि हॉटेल मालकांना रोजगार मिळत असे.


उपजीविकेवर संकट: दरम्यान, मोहम्मद इर्शाद नावाच्या एका दुकानदाराने सांगितले की, पर्यटनाशी संबधित लोकांची परिस्थिती आता खूप गंभीर झाली आहे. सरकारला याकडे लक्ष द्यावे लागेल. गेल्या एका महिन्यापासून लोकांना एक पैसाही कमवता आलेला नाही आणि ही परिस्थिती आता अधिक काळ टिकू शकत नाही.


ल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू

22 एप्रिल रोजी पलगाममधील रमणीय बैसरन व्हॅलीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 25 पर्यटक आणि जीव वाचाविण्याचा प्रयत्न करणार्‍या स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांची नेमकी संख्या महित नाही. परंतु माहितीनुसार, त्यांत चार ते सहा दहशवादी सामील होते. दहशवाद्यांनी पिडितांना त्यांच्या धर्माची पुष्टी करण्यासाठी कलमा म्हणायला लावला आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटने नंतर संपूर्ण देशता संतापाची लाट आहे.

コメント


bottom of page