top of page

पाकचा जिहादी कट उघड; सुवर्ण मंदिरावर ड्रोन हल्ला !




जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर रात्रीच्या अंधारात पाकिस्तानने सुवर्ण मंदिराला लक्ष केले. पण भारताच्या फौलादी सैन्याने वेळेआधिच त्यांचे ‘पाप’ नष्ट केले. सैन्याच्या शूर तोफखान्यांनी एकही क्षण वाया न घालवता हवेत उडणारे प्रत्येक ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केले. मेजर जनरल म्हणाले की, आम्ही सुवर्ण मंदिरावर एकही ओरखडा येऊ दिला नाही. पाकिस्तानचा हा घृणास्पद कट पूर्णपणे हाणून पाडला गेला. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि शौर्याने हा नापाक कट उधळून लावला.


नापाक कृत्य; धार्मिक स्थळांचे युद्धभूमीत रुपांतर

7-8 मे च्या रात्री जेव्हा भारताने आपल्या नागरिकांच्या हौतात्म्याचा बदला घेतला होता आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये “ ऑपरेशन सिंदूर ” ची आग पेटत होती. त्याच रात्री पाकिस्तानी सैन्याने मानवतेविरुद्ध आणखी एक घृणास्पद पाप करण्याचा प्रयत्न केला. सुवर्ण मंदिराला लक्ष्य करून भारताच्या आत्म्यावर हल्ला ! मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी या हल्ल्याचे सत्य उघड केले आणि पाकिस्तानचे कोणतेही लष्करी उद्दिष्ट नाही, फक्त धार्मिक कट्टरता आहे, सांगायला विसरले नाहीत !


मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री म्हणाले की, पाकिस्तानने अंधराचा फायदा घेत ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्य आधीच सतर्क होते आणि त्यांनी सुवर्ण मंदिराच्या संरक्षणासाठी अतिरिक्त हवाई संरक्षण प्रणाली तैनात केल्या होत्या. आमच्या शूर सैनिकांनी सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, त्यामुळे सुवर्ण मंदिराचे कोणतेही नुसान झाले नाही.


नापाक कट:

भारतीय लष्करी प्रतिष्ठानांना बाजूला ठेवून पाकिस्तानने नागरिक आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यास सुरवात केली. आणि यावेळी शिखांच्या पवित्र स्थानाची श्री हरमंदिर साहिबची रडवण्याची पाळी होती! पण भारत तयार होता. आणि शत्रूचा कट तिथेच उधळून लावण्यात आला. अंधार पडताच, पाकिस्तानने ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समूह पाठवला. पण आमच्या हवाई संरक्षण दलाने डोळे मिचकावले नाहीत.

Comments


bottom of page