top of page

पाकिस्तनात हायजॅक झालेल्या रेल्वेमध्ये स्फोट



पाकिस्तानातील जकोबाबादजवळ रेल्वे ट्रॅकवर मोठा स्फोट झाला आहे हा स्फोट हायजॅक झालेल्या जफर एक्सप्रेसमध्ये झाला. स्फोटानंतर एक्सप्रेसचे 6 डब्बे रुळावरून घसरले. ही ट्रेन पेशावरहून क्वेटाला जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकवर तीन फूट रुंद खड्डा पडला आणि सुमारे सहा फूट लांबीचे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. रेल्वे आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत.


स्फोट इतका जबरदस्त होता की डब्यांचे चाक रुळावरून उखडले आणि ट्रेन अचानक थांबली. प्राथमिक अहवालांनुसार, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तरीही अद्याप कोणत्याही मृत्यूची पुष्टी झालेली नाही. बचाव आणि मदत पथके तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.


जकोबाबादजवह जाफर एक्सप्रेसवर झालेल्या स्फोटाने या मार्गाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही ट्रेन यापूर्वीही अनेकदा हल्ल्यांचा बळी ठरली आहे. बलुचिस्तानमधील रेल्वे प्रवास असुरक्षित मानला जातो. हा प्रदेश बराच काळ फुटीरतावाद, हिंसाचार आणि लष्कराविरूद्ध बंडखोरीने त्रस्त आहे.


मार्च2025 मध्ये बीएलए ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते.

याच वर्षी मार्चमध्ये बलुच आर्मी बीएलए ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. त्या वेळी ट्रेनमध्ये सुमारे 350 प्रवासी होते. पकिस्तानी लष्कराने मोठ्या कठणाईने ऑपरेशन राबवून ट्रेन सोडवली, परंतु बीएलए ने दावा केला की त्यांनी 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. मात्र, पाकिस्तान लष्कराने 35 सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली होती.

Comments


bottom of page