पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य, पण दोन महिण्यापासून आमच्या शांततेच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष; नक्षलवाद्यांची मोदी सरकारवर आगपाखड
- Navnath Yewale
- May 27
- 2 min read

पाकिस्तान या शत्रुराष्ट्राने दिलेल्या युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य केला, पण आम्ही दोन महिन्यांपासून देत असलेल्या शांततेच्या प्रस्तावाकडे सरकारने दुर्लक्ष केलं असं सांगत नक्षलवाद्यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. पोलिसांच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या बसव राजूच्या तालमीत अनेक युवा कॉम्रेड नेतृत्वासाठी सक्षम असल्याचंही नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांनी यासंबंधी एक पत्रक काढलं असून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
काय म्हटलं नक्षलवाद्यांनी
माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा प्रवक्ता विकल्पने हा पत्रक जाहिर केलं आहे. सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसव राजू मारला गेल्यानंतर माओवाद्यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे. पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य केला पण दोन महिण्यापासून आम्ही देत असलेल्या शांततेच्या प्रस्तावाकउे मात्र दुर्लक्ष का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. आमचा क्रांतीचा लढा थांबणार नाही, बसव राजूच्या तालमीत तयार झालले अनेक युवा काम्रेड नेतृत्वासाठी सक्षम असल्याचंही नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे.
नंबाला केशव राव उर्फ बसव राजू मारला गेल्यानंतर माओवाद्यांनी पत्रक काढलं. त्यांचा सर्वोच्च नेता मारला गेल्याचं त्यांनी मान्य केले आहे. तसेच केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत देशात कॉर्पोरेट हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी हे हत्याकांड घडवले जात असल्याचा आरोपही नक्षलवाद्यांनी केला.
आत्मसर्पण केलेल्यांनीच बसव राजूचे लोकेशन दिले: आमचा सर्वोच्च नेता बसव राजूची सुरक्षा करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो ही माओवाद्यांनी मान्य केले आहे. गेल्या काही आठवड्यात बसव राजूच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष तुकडीमधील काही लोकांनी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले होते आणि तिथेच आमचा घात झाला. त्यांनीच पोलिसांना बसव राजूच्या लोकेशनची पोलिसांना माहिती दिली असे माओवाद्यांचे म्हणणे आहे.
हा लढा थांबणार नाही. बाला केशव व उर्फ बसव राजूच्या तालमीत तयार झालेले अनेकयुवा कॉम्रेड आहे. सशक्त सेंट्रल कमिटी आहे. त्यामुळे नवीन नेतृत्व तयार होईल असा विश्वासही माओवाद्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
एप्रिल महिन्यात शांततेचा प्रस्ताव
नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे उप्रिल महिन्यात शांततेच्या प्रस्तावावर चर्चा करायची आहे असं सांगत एक महिन्यासाठी नक्षलवादविरोधी ऑपरेशन थांबवावे अशी मागणी केली होती. या दरम्यान आम्ही कोणताही गोळीबार करणार नसल्याचं नक्षलवाद्यांनी सांगितलं होतं.
Comments