पाकिस्तानाच्या ताब्यातील जवान मायदेशी परतले
- Navnath Yewale
- May 14
- 1 min read

पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार साहू भारतात परतले आहेत. वाघा अटारी सीमेवरून हे सैनिक भारतात परतले आहेत. पाकिस्तान रेेंजर्सनी बीएसएफ जवानाला परत पाठवले आहे. पंजाबधील फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात असलेले 40 वर्षीय पूर्णम कुमार साहू यांनी 23 एप्रिल रोजी चुकून आंतराष्ट्रीय सीमा ओलांडली होती, त्यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.
पुणम कुमारच्या परफेडीबाबत बीएसफ ने सांगितले की, आज 23 एप्रिल पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले आज सकाळी 10:30 वाजता अमृतसरमधील अटारी येथील संयुक्त चेकपोस्टवरुन पतीचे काम पूर्ण झाले. ही प्रक्रिया शांततेत निर्धारित प्रोटोकॉलनुसार पूर्ण झाली.
.
दरम्यान (5 मे) रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील एका बीएसएफ कॉन्स्टेबलला पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी हे सैनिकाच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहेत.
या घटनेनंतर, बीएसएफने आपल्या सर्व सैनिकांना सतर्क राहण्याच्या आणि गस्त घालताना अतिरिक्त काळजी घेण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. बीएसएफ ही भारत- पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेसाठी मुख्य दल आहे, जी एकून 3,323 किलोमिटर लांबीच्या सीमेवर लक्ष ठेवते. ही श्रेणी जम्मू आणि काश्मीर ( एलओसी काही भागांसह), पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये पसरलेली आहे. ऐतिहासिक तणाव आणि सध्याच्या सुरक्षा आव्हानामुळे ही सीमा देशाच्या सर्वात संवेदनशील सीमांपैकी एक मानली जाते.
Comments