top of page

पाकिस्तान अधिकार्‍याची कबुली; पुलवामा हल्ल्यात नापाक हात



भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळं उद्धवस्त केले. बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मु काश्मीसह पंजाब, राजस्थान राज्याच्या सीमा भागात ड्रोन, मिसाईल हल्ले भारतीय लष्कराने परतुन लावले. शस्त्रबंदी असताना 10 मे रोजी सीमावर्ती भागात पाकिस्तानने गोळीबार केला यानंतर पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍याने खुलासे करताना पुलवामा हल्ल्याचा संदर्भ दिला.


पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली आता खुद्द पाकिस्ताननेच दिलेली आहे. यासंदर्भातली कबुली पाकिस्तानच्या एका अधिकार्‍याने दिली आहे. आम्ही आमच्या रणनीतीचं कौशल्य दाखवल्याची कबुली पाकिस्तानी हवाई दलाचा अधिकारी सय्यद औरंगजेब याने दिली आहे. एका पत्रकार परिषदेत त्याने ही कबुली दिली.


यावेळी हा अधिकारी म्हणाला की, जर पाकिस्तानच्या जमीन,हवा, पाणी लोकांना धोका निर्माण झाल्यास कोणतीही तडजोड करणार नाही. पुलवामा हल्ल्याच्यावेळी आम्ही आमच्या रणनीतीचं कौशल्य दाखवल, असंही या पाकिस्तानी अधिकार्‍याने म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानी सैन्यावरील विश्वास आम्ही कोणत्याही परिस्थितीत जपतो. आता आम्ही आमची लष्करी प्रगती आणि धोराणात्मक कौशल्य दाखवू, असंही यावेळी पाक अधिकार्‍याने म्हटलं आहे.

Comments


bottom of page