top of page

पायलटला हिम्पोटाइज करून पाठवलं होतं?, अजित दादांच्या अपघाताला 50 कोटींचा अँगल!

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनावर राज्यातील अनेक नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. यावर मंगळवारी रोहित पवार मोठं भाष्य करणार असल्याचे समोर आलेय. पण त्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी आणखी एक संशयाचा अँगल उपस्थित केलाय. अजितदादांच्या विमानाच्या पायलटला हिप्मोटाइज करून पाठवलं होतं का? कारण, पायलेटने कॉल दिला नाहीये. टेकऑप घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं, मात्र, तेही त्याने केलं नव्हतं त्यामुळं या व्हीएसआर कंपनीवर मोठी शंका आहे. 50 कोटींचा विमा काढून हे कृत्य करायला लावलं का? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.


व्हीएसआर कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच नादुरूस्त होती, वर्षभरापासून कंपनीवर बंदी होती. आणि तेच विमान अजितदादांसाठी 28 तारखेला दिल्या गेले. दुसरीकडं, डिसेंबर 2025 च्या महिन्यात व्हीएसआर कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा उतरवला आहे. जर 50 कोटींचा विमा उतरवल्या गेला असेल, आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला, त्याला हिप्मोटाइज़ केले होते का? त्याला अमिष दाखवलं होतं का? असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला आहे. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुपारचा भेटीचा वेळ घेतला आहे. त्यावेळी सविस्तर चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अनेक ठिकाणी हिम्पोटाइज करून सुसाईड बॉमरचा वापर केला जातोय. दरम्यान, अजमल कसाब याला दहशतवादी हल्ल्यासाठी पाठविलं होतं. दुसरीकउे राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती, त्यावेळी देखील असा प्रयत्न केला गेला होता. पायलटला हिम्पोटाइज करून पाठवलं होतं का?, हा मोठा प्रश्न आहे. पायलटने मे डे कॉल दिला नाही, असा संशय त्यांनी उपस्थित केला.


दादांच्या विमान अपघातप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष आहे. मला अपेक्षा आहे 10 तारखेच्या पत्रकार परिषदमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते सादर करतील. त्यामुळे रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहणं अतिशय महत्वाचं आहे. असं मला वाटतं, असे मिटकरी म्हणाले. सुनेत्रा वहिनी ह्याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील. त्याच अध्यक्ष झाल्या पाहिजे आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित दादासाठी जो कार्यकर्ता रडला, जीवापाड दादांवर प्रेम केलंय. अजितदादा गेल्यानंतर आजही ज्याच्या घरात सुतक आहे. ते कार्यकर्ते पण महत्वाचे आहेत. अजित दादा नंतर त्या जागेचा अधिकार सुनेत्रा वहिनींनाच आहे. त्यामुळे प्रस्तावाची भाषा कोणीही करू नये, असे मिटकरी म्हणाले.

Comments


bottom of page