पिनाका रॉकेट: 44 सेकंदात शत्रूचे बंकर उद्ध्वस्त!; चीन- पाकिस्तानची वाढली चिंता?
- Navnath Yewale
- Jul 9
- 1 min read

भारताने आपल्या स्वदेशी संरक्षण शक्तीला आणखी एक मोठे बळ दिले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ओडिशाच्या चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रात पिनाका लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीने लांब अंरावरुन अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद करण्याची भारताची क्षमता सिद्ध केली आहे.
पिनाका ही आधीपासूनच भारतीय लष्कराची एक विश्वासार्ह मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर प्रणाली आहे. नवीन एलआरजीआर आवृत्तीच्या समावेशामुळे तिची संहारक क्षमता आणि पल्ला दोन्ही वाढले आहेत. पिनाका एलआरजीआर अति धोकादायक आणि विशेष आहे.
पिनाका एलआरजीआर डीआरडीओ नेे विकसित केलेली भारताची स्वदेशी मार्गदर्शित रॉकेट प्रणाली आहे. ही पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरची एमबीआरएल एक प्रगत आवृत्ती आहे. तिचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिची लांब पल्ल्याची अचूक मारा करण्याची क्षमता आहे. अलीकडील एका उड्डाण चाचणीत, तिने अत्यंत अचूकतेने नियोजित लक्ष्यावर मारा केला. त्यामुळे भारतीय लष्कराला युद्धादरम्यान दूरच्या शत्रूंवर जलद आणि प्रभावी हल्ले करण्याची शक्ती मिळेल.
पिनाका सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची जलद मारा करण्याची क्षमता. ती केवळ 44 सेकंदात 12 रॉकेट डागू शकते. एकाच मार्यात, ती अंदाजे 700 ते 500 मिटरच्या क्षेत्राला लक्ष्य करू शकते. मार्गदर्शित तंत्रज्ञानामुळे ती अधिक अचूकतेने लक्ष्यावर मारा करू शकते. यामुळेच, कमी वेळात शत्रूची ठिकाणे, बंकर आणि लष्करी तळांचे मोठे नुकसान करण्यास सक्षम असलेले शस्त्र म्हणून याकडे पाहिले जाते.
पिनाका केवळ भारतीय लष्कराची ताकदच वाढवत नाही, तर भारताच्या संरक्षण निर्यातीला एक नवीन ओळखही देत आहे. अर्मेनियाने ही प्रणाली आधीच खरेदी केली आहे. तर फ्रान्ससह इतर इनेक देशांनी यात रस दाखवला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आणि सांगितले की, यसा यशामुळे भारतीय सशस्त्र दलांची मारक क्षमता आणखी मजबूत होईल. त्यामुळे भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानावरील जागतिक विश्वासही वाढत आहे.



Comments