पुणे पुन्हा हादरलं :9 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिकांच्या प्रसंगावधानाने टळला प्रसंग; संतप्त नागरिक रस्त्यावर , घटनास्थळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा
- Navnath Yewale
- May 5
- 1 min read

पुणे : पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वती भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पर्वती पोलीस ठाण्याबाहेर नागरिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्वती भागात 50 वर्षीय व्यक्तीने बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नागरिकांनी वेळीच घटना पाहिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर नागरिक थेट पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले.
नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नेमकी घटना काय आहे, याबाबत कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज्यात अत्याचाराच्या घटना वाढल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



Comments