top of page

पुण्याच्या श्रावणी कुदळे हिचा नीट परीक्षेत ट्रीपल विक्रम, मुलींमध्ये देशात पहिली बारामतीच्या नावे नवा रेकॉर्ड

पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नीट यूजीचा निकाल जाहीर झाला आहे. नीट परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाची पानशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवून संयुक्तपणे देशात अव्वल स्थान पटकवले आहे. या नीट परीक्षेत पुण्याच्या श्रावणी कुदळेने ट्रीपल रेकॉर्ड केला आहे. श्रावणी देशात मुलींमध्ये पहिली आहे. बारामतीत राहणार्‍या श्रावणीने बारामतीच्या नावे नवा विक्रम रचला आहे.


पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील श्रावणी कुदळे नीट परीक्षेत देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. तर महाराष्ट्रात ती पहिली आहे. अशा प्रकारे नीट परीक्षेत श्रावणीने ट्रीपल रेकॉर्ड रचला आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळेने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे आई-वडील देखील आनंदी आहेत.


श्रावणीचे कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे हे दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत. मुलीने मोठं यश संपादन करेल असं वाटलं नव्हतं तीन यश संपादन केलं त्याचं कौतुक तिच्या आई- वडिलांना आहे. 720 पैकी तिने 710 मार्क मिळवले आहेत. बायोलॉजी मध्ये 360 पैकी 360 मार्क केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 फीजिस्क 180 पैकर 175 मार्क मिळाले आहेत.

दरम्यान नीट परीक्षेची तयारी करत असताना श्रावणीने अजिबात मोबाईलचा वापर केला नाही. टी.व्ही देखील तिने पाहिला नाही.


तिने संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले होते असे तिचे वडिल कृष्णा कुदळे सांगतात. ग्रामीण भागात राहून मुलीने इतकं घवघवित यश मिळवल्याचा खूप अभिमान वाटत असल्याचे तिची आई जयश्री कुदळे यांनी सांगितले. कधीही अभ्यासात खंड पडू दिला नाही. सुरुवातीपासून कष्ट धेतले. यश पाहिजे असेल तर सुरुवातीपासून अभ्यास करा, घाबरून जाऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा असा सल्ला श्रावणीने इतर विद्यार्थ्यांना दिला आहे.


आज शुक्रवारी (दि.17 ) नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहेश, त्यानुसार देशभरातील 11 लाख 2 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 3 मे च्या पेपरफुटीनंतर 20 लाख विद्यार्थ्यांनी फरपरीक्षा दिली होती.

Comments


bottom of page