top of page

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळला 6 जणांचा मृत्यू, 30 ते 35 जण वाहून गेल्याची भिती



मावळ (जि.पुणे) तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत आनेक पर्यटक इंद्रायणी नदीत बुडाले असून 30 ते 35 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये काही लहाण मुलांचाही समावेश असल्याचे माहिती आहे. दरम्यान या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.


पावसाळ्यात पुण्यातील मावळमधला कुंडमाळ पर्यटकांनी गजबजलेला असतो. इंद्रायणी नदी पार करण्यासाठी येथे जूना पूलाचा मार्ग अवलंबवावा लागतो. याच पुलावर रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पर्यकांची गर्दी होती. अचानक हा पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल झाले.


सुट्टीचा दिवस,पर्यटकांची गर्दी:

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने येथे मोठ्या संख्येेने पर्यटकांनी गर्दी केली होती. काही जण पुलावर उभारलेले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अंदाजे 30 ते 35 जण बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे.

कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीआरएफ च्या जवानांचे मदतकार्य सुरू आहे. बुडालेल्या काही पर्यटकांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय अग्नीशमक दलाचे कर्मचारीही मतदकार्यात सक्रिय असून आणखी काही आडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


पर्यटकांची सुरक्षा वार्‍यावर :

कुंडमाळ हे ठिकाण पर्यटनस्थळ आहे, शहरातपासून जवळच असलेल्या या पर्यटनस्थळावर नेहमीच गर्दी असते. तेवढेच हे ठिकाण धोकादाय असल्याचंही सांगितल जात आहे. पावसाळ्यात, विशेषत: शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करतात. येथील इंद्रायणी नदीवर जून पूल आहे. अद्यापर्यंत त्याचीही कधी डागडूजी करण्यात आली नाही. असं असलं तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहात मोठी वाढ होत आहे. त्यातच येथे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजनांचा कायम अभाव हा दुर्घटनेचे एक कारण ठरला आहे.


मृतांचा आकडा वाढण्याची भिती:

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक लोकांकडून बचावकार्य करण्यात येत आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Comments


bottom of page