top of page

पुण्यातील खराडी ‘रेव्ह पार्टी’ प्रकरण पोलिसांनाच भोवणार!

घरातील पार्टीला रेव्ह पार्टीचं नाव, एकनाथ खडसे यांची बदनामी होईल अशी पद्धतशीर कृती, प्रकरण उच्च न्यायालयात जाणार

ree

पुण्यातील हायप्रोफाईल खराडी येथील रेव्ह पार्टी छापा प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने चांगलेच राजकारण तापले आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजनांवर हनी ट्रॅप प्रकरणात आरोप केल्या नंतर चार दिवस रेकी करून पोलिसांनी एकनाथ खडसेंच्या जावयास आडकल्याचा संशय खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला, तर सुषमा अंधारे यांनी जानिवपूर्वक घरातील पार्टीला रेव्ह पार्टीचं नांव देत एकनाथ खडसे यांची बदनामी करायची आणि हनी ट्रॅप प्रकरणात त्यांना गप्प बसवायचं यासाठीचं हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी पोलिसांच्या कर्तव्यावर संशय व्यक्त करत हे प्रकरण आता पोलिसांनाच भोवणार असल्याचे धक्कादायक दावा केला आहे.


माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हनी टॅ्रप प्रकरणावरुन मंत्री गिरिश महाजन यांच्यावर आरोपांची माळ लावली आहे. शिवाय मंत्री गिरिश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा याच्यावर हनिट्रॅप प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याने राज्यभरात हनी ट्रॅप प्रकरण चांगलेच तापले. दरम्यान, राज्यभरातील 72 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी व राजकारणी यामध्ये आडकल्याचे बोलले जात आहे. प्रफुल्ला लोढाच्या अटकेमुळे गिरिश महाजन यांचे नांव हनी ट्रॅपशी जोडले जात असल्याचा दावा करत एकनाथ खडसे यांनी गिरिश महाजनांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.


हनी ट्रॅप प्रकरण विशिष्ठ वळणावर असतानाच एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले आले. आता अ‍ॅड. असीम सरोदे यांनी पोलिसांच्या कारवाईवरच संशय व्यक्त करत पोलिसांनी कारवाईच्या पूर्वीचा व्हिडिओ चित्रीकरण केले. एकनाथ खडसे यांच्या बदनामीसाठी सोयीस्कर न्यायालयापूर्वीच व्हिडीओ व्हायरल केले. शिवाय पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्याच बदलून टाकल्याचा आरोप केला आहे. इराणी लोकांच्या उत्सवा दरम्यान पुण्यातील ढोले रोडवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली होती. त्यास रेव्ह पार्टीचे नावं दिले होते.


या कारवाईमध्ये अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी कारवाईपूर्वीचा व्हिडिओ चित्रीत करून न्यायालयापूर्वीच तो व्हायरल केला. जेणेकरून एकनाथ खडसे यांची बदनामी होईल? मात्र हे प्रकरण आता उच्च न्यायालयात जाऊ शकते यामध्ये प्रांजल खेवलकर यांना जामिन मिळणार यात शंका नाही पण, पोलिसांच्या मात्र आंगलट येणार हे निश्चित असा दावा केला आहे.

Comments


bottom of page