top of page

पेट्रोल डिझेल 2 तर घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागला


केंद्र सरकारने एलपीजीच्या घरगुती सिलेंडर (14.2 किलो) मध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.उज्वला योजनेच्या ग्राहकांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.या शिवाय भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईल या कंपण्याकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढीचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लागू केला आहे. त्यामुळे सर्वसामन्यांच्या खिशाला आता महागाईची झळ बसणार आहे.


केंद्र सरकारने स्वयंपाकासाठी लागणारा एकलपीजी गॅस व पेट्रोल डिझल दरवाढीचा निर्णय लागू केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या बाबात घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थींसाठीवच्या सिलेंडरची किंमत 500 रुपयांवरुन 550 झाली आहे तर इतर ग्राहकांसाठी सिलेंडरची किंमत 803 रुपयांवरुन 853 रुपये झाली आहे. पुरी म्हणाले की, हे एक असे पाऊल आहे ज्याचा आपण नंतर आढावा घेवू सरकारच्या निर्णयामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.


आयात शुल्क वाढीचा अवघ्या जगात परिनाम होणार असे म्हटले जात असताना आता त्याची झळ थेट सर्वसामांन्याना बसु लागली आहे. घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचे वाढविण्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढविले आहेत. या शुल्कात दोन रुपये लिटर इतकी वाढ केली. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, यापुढे पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत हा खर्च पेट्रोलियम कंपण्या करतील.


मंत्री पुरी पुढे बोलताना म्हणाले की, पेट्रोल डिझेलवर वाढविण्यात आलेल्या उत्पादन शुल्काचा उद्देश हा ग्राहकांवर ओझे टाकण्याचा नाही. गेल्या काही दिवसात अंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. जवळ-जवळ 60 डॉलर प्रती बॅरल पर्यंत किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझलच्या किरकोळ किमतीत घट अपेक्षीत होती.

पण आता उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने असे होण्याची शक्यता कमी झाली आहे. नविन किमती आज पासून(दि.8) लागू होणार आहेत. तेल कंपण्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी म्हणाले.

Comentários


bottom of page