पोलिसातल्या माणुसकीने पेटवली मानवतेची मशाल ! नांदेड पोलिसांचा रोजगार मेळावा; हजारो बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगार
- Navnath Yewale
- May 4
- 2 min read

सिंचनाचा अभाव, पाण्याचे दुर्भीक्ष, सततची नापिकी आणि औद्यागिक क्षेत्राचा अभावामुळे बरोजकारीच्या भस्मासुरापुढे रोजगारीने हात टेकले. त्यामुळे मराठवाड्यात चांगला सुशिक्षीत तरुण पुणे, मुंबई सारख्या महानगराकडे धाव घेतो. पण ज्यांना रोजगाराचा मार्गच सापडत नाही तो गावाला चिटकून परिस्थतीला तोंड देत बेरोजगारशी दोन हात करतो. परिस्थितीशी संघर्ष करणारा गावच्या वेशीतला बेरोजगार तरुण नशिबाला दोष देत कधी व्यसनाधीन होतो हे त्यालाही कळत नाही. मग इथून सुरु होतो तंट्याचा प्रवास, बेरोजगार तरुण नेहमीच कधी कौटूंबीक तर कधी सामूहीक तंट्याचं अंग ठरत आला आहे. शहरासह ग्रामीण भागात किरकोळ वाद, तंटे यातून घडणार्या गंभीर गुन्ह्यात आडकत चाललेल्या बेरोजगार तरुणासाठी भानगडीच्या मुळावर घाव घातल नांदेड पोलिसांनी रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून दिला आहे.

‘मिशन उडान’ अभियानंतार्गत नांदेड पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देवून त्यांना हक्काचा रोजागार उपलब्ध करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतिने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या सुनियोजीत कार्यप्रणालीमुळे गेल्या महिनाभरापासून जिल्हाभरात रोजगार मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार स्वत: सामाजीक संस्था, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले.
जिल्ह्यात एकही बेरोजगार मेळाव्या पासून वंचित राहू नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्यांकडून कार्यक्षेत्रातील बेरोजगारांचा एकप्रकारे सर्वेच केला. त्यांचा डाटा कलेक्ट करुन जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षामार्फत थेट त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. गावखेड्यासह वाडी, वस्ती-तांडा, पाड्यांवरील बरोजगारांना अवश्यक असणार्या रोजगारा विषयी समाजिककार्यर्ते, पोलिस पाटील, सरपंच, गावपुढार्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या शिवाय जिल्हा परिषदेकडूनही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालयांमार्फत पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी बेरोजगारापर्यंत संदेश पोहोचवला. तब्बल महिनाभराच्या अथक प्रयत्नातून शनिवारी (03 मे एप्रिल) पोलिस मुख्यालयात बेरोजगार मेळावा संपन्न झाला.

नऊ हजार नोंदणी
जिल्हा पोलिस दलाच्या रोजगार मेळाव्यासाठी जिल्हाभरातून तब्बल 9000 बेरोजगार तरुणांनी रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. विशेष म्हणजे या निशुल्क नोंदणीमध्ये जिल्हाभरातील तरुणांनी हिरिरीने सहभाग नोंदवला.
6015 उमेदवारांचा प्रत्यक्ष सहभाग
जिल्ह्यातील गावखेड्याच्या गल्ली बोळातील बेरोजगार तरुणांनी नोंदणीत सहभाग घेत प्रत्यक्षात तब्बल 6015 उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन रोजगारासाठी कौन्सलिंग केले.
3502 उमेदवारांना नोकरी
जिल्हा पोलिस दल आयोजीत रोजगार मेळाव्यात सहभागी तब्बल 3502 उमेदवारांना राज्यभरातील नामांकीत कंपन्यामध्ये नोकरी मिळाली आहे. बेरोजगार तरुणांच्या शिक्षणपात्रतेनुसार कंपण्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील साडे तीन हजारांवर तरुणांना कायमचा हक्काचा रोजगार मिळाला आहे.

96 कंपन्यांचा सहभाग
नांदेड जिल्हा पोलिस दल अयोजीत बेरोजगार मेळाव्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे सहाय्यक पोलिस महानिरिक्षक शहाजी उमाप, पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्य अवहानाला प्रतिसाद देत राज्यभरातील 96 कंपन्यांनी सहभाग घेतला.
8000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था
जिल्हा पोलिस दल आयोजीत रोजगार मेळाव्यासाठी तरुणांच्या जेवनाची सोय करण्यात आली होती. प्रत्यक्षात मेळाव्यात सहभागी होणार्या उमेदवारांसह इतरांसाठी जवळपास 8000 लोकांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.

नियोजन, शिस्तीचे दर्शन
जिल्हा पोलिस दल आयोजीत रोजगार मेळाव्यात सहभागी कंपन्या, उमेदवार यांच्यामधील शिस्त वाखणण्यााजोगी होती. पोलिस कार्मचार्यांच्या अथक प्रयत्नातून प्रत्येक कंपनीचे स्टॉल, उमेदवार- कंपनी होल्डरशी सुसंवाद कार्यक्रमस्थळी स्वच्छता, नियोजनाचे दर्शन घडून आले.
留言