पोलिस अधिकारी पतीची हत्या केल्या नंतर, पत्नीचा शेजारणीला व्हिडिओ कॉल
- Navnath Yewale
- Apr 21
- 2 min read
मिरची पुड टाकून; हातपाय बांधून, चाकून सपासप वार

कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्ये एकच खळबळ उडाली आहे. रविवारी आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात दिसून आलं की ओम प्रकाश यांचा त्यांच्या पत्नी पल्लवीसह कुटुंबातील एका सदस्याला हस्तांतरित केलेल्या काही स्थावर मालमत्तेवरुन वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने आधी त्यांच्यावर मिरची पवाडर फेकली आणि बांधून ठेवत हत्या केली. 68 वर्षीय पोलिस आयुक्तांची हत्या करण्यासाठी ग्लास बॉटलचाही वापर करण्यात आला.
हत्या केल्यानंतर पल्लवीने आपल्या शेजार्याला फोन केला आणि हत्या केल्याची कबुली दिली अशी माहिती आहे. ‘मी राक्षसाला ठार केलं आहे’ असं तिने व्हिडीओ कॉल करुन सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश आणि पल्लवी यांच्यात रविवारी दुपारी 3:30 च्या सुमारास भांडण झालं यांनतर पल्लवीने मिरची पावडर टाकून ओम प्रकाश यांचे हात पाय बांधले. यानंतर तिने एकामागोमाग अनेक वेळा चाकून वार केले.
सुत्रांच्या माहितीनुसार पल्लवीने पोलिस अधिकार्याची पत्नी असणार्या शेजारील मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करून सांगितले पतीची हत्या केली. त्या महिलेने तिच्या पतीला कटवलं. पोलिस ओम प्रकाश यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी तातडीने पल्लवी आणि त्या जोडप्याच्या मुलीला ताब्यात घेतलं.
पल्लवी आणि मुलगी कृती यांची 12 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. वैद्यकिय तपासणीत ओम प्रकाश यांच्यावर दोन चाकूंनी वार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेय याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने म्हटलं की, त्याची आई आणि बहिण दोघीही नैराश्याने ग्रस्त आहेत, आणि त्यांनी यापूर्वी त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमक्यां नंतर, ओम प्रकाश त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. परंतु मुलीने 48 तासांपूर्वीच त्यांना परत घरी आणलं होतं.
त्याने सांगितले की तो डोमलूरमधील एका कार्यक्रमासाठी बाहेर होता. शेजार्यांनी त्याला घरी बोलावलं . घरी पोहोचला तेव्हा त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. “माझी आई पल्लवी आणि माझी बहिण कृती या नैराश्याने ग्रस्त आहेत आणि माझ्या वडिलांशी वारंवार भांडत होत्या. मला असा संशय आहे की ते माझ्या वडिलांच्या हत्येत सहभागी आहेत”असं त्याने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेलं नाही.
मूळचे बिहारचे असलेले ओम प्रकाश यांनी भूगर्भशास्त्रात पदव्यूत्तर पदवी घेतली आहे. मार्च 2025 मध्ये ते कर्नाटकचे पोलिस महासंचालक झाले. यापूर्वी त्यांनी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते.
Comments