पोलिस कोठडीत पितापूत्रांच्या मृत्यू प्रकरणात तामिळनाडूत 9 पोलिसांना मृत्यूदंड
- Navnath Yewale
- Apr 7
- 2 min read

तामिळनाडूच्या सथानकुलम येथे पितापूत्र जयराज आणि बेनिक्स यांचा पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराई कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. इन्स्पेक्टर श्रीधर यांच्यासह 9 पोलिसांना दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
बापलेकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराईच्या जिल्हा कोर्टाने सोमवारी नऊ पोलिस अधिकार्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. जून 2020 मध्ये तामिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यात पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती मुथुकुमार यांनी सर्व 9 दोषी पोलिसांना दोनदा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी कारण त्यांनी या बापलेकांची हत्या केली आहे.
या प्रकरणात शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती की शिक्षा अशी व्हायला हवी की भविष्यात असा अपराध रोखण्यासाठी एक महत्वाची ठरेल. गुन्ह्याची गंभीरता पाहाताना आरोपींना केवळ जन्मठेप पुरेसी नाही. न्यायमूर्ती म्हणाले की निकालात समाजाचा अंतरात्मा दिसायला हवा या घटनेने समाजाच्या सामुहिक अंतरात्म्याला खूप धक्का बसलेला आहे.
पोलीस कोठडीतील मृत्यू संदर्भात 2011 मध्ये मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. तरीही लॉकअपमध्ये असे मृत्यू होणे दु:खद आहे. यासाठी जास्तीत जास्त शिक्षा देणे सर्वात चांगला पर्याय होईल. हे कळणे कठीण आहे की कोणी जास्त मारहाण केली असेही न्यायमूर्तींनी निकाल देताना नमूद केले.
दरम्यान, न्यायमूर्ती मुथुकुमार यांनी नि:शस्त्र पिता-पूत्रावर रात्रभर अन्ववित टॉर्चर करण्याचे हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात म्हटले आहे. त्यांनी सांगितले की दोषी हे शिकलेले अधिकारी होते. यासाठी हा गुन्हा साधारण गुन्हा ठरत नाही. केवळ जन्मठेपेच्या शिक्षा पोलिस खात्यात भिती निर्माण करण्यास नाकाम ठरेल असेही न्यायमूर्ती मुथुकुमार यांनी सांगितले. सरकारी पक्षाने या प्रकरणात आरोपींना कोणतीही दया दाखवू नये त्यांना अधिकाधिक शिक्षा सुनावण्यात यावी असा युक्तीवाद कोर्टात केला आहे.
सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायमूर्ती म्हणाले की, दोघांना पोलिस कोठडीत पोलिसांनी टॉर्चर केले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे कोणतेही शस्त्रे नसतना त्यांना कस्टडीत संपूर्ण रात्रभर मरापीट केली. दोघेही व्यापारी होते. समाजात त्यांचा चांगली उठबस होती.
असे वाटते की त्या दोघांवर कोणताही क्रिमिनल केस पेंडिंग नव्हती. या आधारे शिक्षा कमी करण्याची दोषींचे कुटुंबे त्यांच्यावर अवलंबून आहेत, हे स्वीाकरा केले जाऊ शकत नाही. शिक्षा गुन्ह्याच्या नेचरच्या आधारे निश्चित केली जायला हवी. कारण दोषींनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. यासाठी यास एक गंभीर गुन्हा मानला गेला पाहिजे. जे लोक जनतेच्या पैशातून सरकारी वेतन घेतात, ते आर्थिक तंगी वा मानसिक तणाव कमी करणारे कारण नाही सांगू शकत.
1.40 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश : या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीाआयने सखोल तपास करताना मदुराई जिल्हा न्यायालयात 2427 पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आधारावर पिता- पुत्राच्या लॉकअपमधील हत्ये प्रकरणात दहा पोलिसांना दोषी ठरवले. त्यातील एका पोलिसाचा कोरोना काळात मृत्यू झाला. उर्वरित नऊ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पीडितांच्या वतीने यक्तीवद करणारे वकील जबा सिंह म्हणाले की कोर्टाने एक महत्वाचा निकाल सुनावला, ज्यात ए1 ते ए9 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. पहिल्या आरोपीला (ए1) 24 लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.
दुसर्या आरोपीला 16.30 लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. एकूण मिळून मृताची आई बेनिस्कला 1.40 कोटी रुपयांची भरपाई मिळायला हवी. कोर्टाने आदेशात म्हटले की जर दंड भरला नाही तर त्यांची संपत्ती जप्त करून विकण्यात यावी आणि ही रक्कम पीडितांच्या वारसांना द्यावी



Comments