पोलिस-नक्षलमध्ये भीषण चकमक; चार कुख्यात माओवादी ठार, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त
- Navnath Yewale
- May 23
- 2 min read

राज्यातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्यास भीषण चकमकीत चार कुख्यात माओवादी ठार झाले.गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सुरू झालेली ही चकमक गुरुवार,22 मे रोजी सकाळपर्यंत सुरू राहिली. ज्यामध्ये सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या जोरदार गोळीबाराला योग्य उत्तर दिले. या कारवाईत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचे मृतदेह सापडल्याचे गडचिरोली पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्तास्त्रे जप्त करण्यात आली. ज्यामध्ये एक स्वयंचलित सेल्फ-लोडिंग रायफल, दोन 303 रायफल आणि एक भरमार (देशी बनावटीचे शस्त्र) यांचा समावेश आहे. या शिवाय घटनास्थळावरुन वॉकी -टॉकी सेट, छावणीचे साहित्य, नक्षलवादी साहित्य आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
अचूक गुप्त माहितीच्या अधारे कारवाई: गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर इंद्रावती नदीच्या काठावर, अलीकडेच उघडलेल्या फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) कवंदेजवळ माओवादी कारवायांबद्दल विशिष्ठ गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, विशेष प्रशिक्षीत कमांडो फोर्स सी-60 च्यसा 12 तुकड्यांनी (सुमारे 300 कमांडो) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कर्मचार्यांनी केली. बुधवारी दुपारी सुरक्षा दलांनी कवंडे आणि नेलगुंंडा येथून कारवाई सुरू केली आणि मुसळधार पाऊस असूनही इंद्रावती नदीकाठी असलेल्या घनदाट जंगलाकडे वाटचाल केली.
माओवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार, दोन तास चकमक:
सुरक्षा दल नदीकाठावर पोहोचत असताना माओवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण रणनीतीने प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुमारे दोन तास चालली, ज्यामध्ये चार माओवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या माओेवाद्यांची ओळख आद्याप पटलेली नाही, परंतु पोलिसांच्या मते, हे सर्व कुख्यात आणि जुने सक्रिय माओवादी होते.
गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणाले की, ही कारवाई सुरक्षा दलांच्या माओवाद्यांविरुद्ध सुरु असलेल्या प्रयत्नांचे एक मोठे यश आहे. ते म्हणाले की, ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे जेणेकरून इतर माओवादी लपले असतील तर त्यांनाही शोधता यईल.
स्थानिकांचा आत्मविश्वास वाढला: या मोहिमेच्या यशामुळे माओवाद्यांचा उत्साह तर कमी झालाच आहे. शिवाय स्थानिक ग्रामस्थांचा सुरक्षा व्यवस्थेबद्दल विश्वासही वाढला आहे. सतत सक्रिय राहून, सी-60 कमांडो आणि पोलिस दल नक्षलग्रस्त भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या चकमकीतून हे देखील दिसून येते की, सुरक्षा दलांना आता माओवाद्यांच्या हालचालींबद्दल वेळेवर आणि अचूक माहिती मिळत आहे आणि ते जलद कारवाई करण्यास सक्षम आहेत.
सुरक्षा दलांचे मनोबल उंचावले: गडचिरोली जिल्ह्यातील ही कारवाई नक्षल निर्मुलन मोहिमेच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल आहे. चार माओवाद्यांना ठार मारणे, शस्त्रे आणि नक्षलवादी साहित्य जप्त करणे यावरुन हे स्पष्ट होते की, नक्षलवाद्यांच्या बालेकिल्यातही सुरक्षा दलांचे वर्चस्व झपाट्याने वाढत आहे. सुरक्षा संस्थांचे हे प्रयत्न येणार्या काळात या प्रदेशात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने निर्णायक ठरू शकतात.
Comments