top of page

पोलिस निरिक्षकासह महिला पोलिस कर्मचारीच एसीबीच्या जाळ्यात


सरकारी बाबुंना टेबलावरच्या कमाईची चांगलीच लत लागली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकार्‍यांपासून, तहसीलदार, तलाठ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे शिवाय पंचायत विभागातील जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायती पर्यंत अधिकारी कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, आता गृह विभागही मागे नसल्याचे या कारर्वावरुन पुढे येत आहे. असल्याने निश्चितच महसूल विभागात लाचखोरीचे प्रमाण अधिक म्हणावे लागेल.


धाराशीवमध्ये पोलिस खात्यातील अधिकार्‍यावर एसीबीने कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धारशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक व महिला पोलिस अंमलदार यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्हातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलिस निरिक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.



दरम्यान, दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. त्यात धाराशीव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातही लाचलुचपत विभागाने थेट कारवाई करत तलाठ्याला रंगेहात अटक केली होती.

Comentarios


bottom of page