पोलिस महानिरिक्षकांना अटक होणार? पोलीस दलात खळबळ
- Navnath Yewale
- Feb 23
- 1 min read

पटणा: बिहारच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशमधील विशेष पथक आयपीएस अधिकारी एम. सुनील नायक यांच्या निवास्थानी पोहोचली आहे. बिहारमधील शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्या सरकारी निवास्थानावर सकाळी पोलिसांचं पथक पोहोचलं. सुनील नायक हे सध्या बिहारच्या अग्नीशमन विभागाच्या पोलीस महानिरिक्षक पदावर नियुक्त आहेत.
सन 2011 साली सालातील आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागात होते. त्यांच्यावर एका माजी खासदारांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर आंध्र प्रदेशात नेण्याची तयारी सुरू आहे. एम. सुनील नायक हे 2024 साली आंध्र प्रदेश सीआयडीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या आदेशानंतर तत्कालीन खासदार रघुराम कृष्णा राजू यांना अटक करण्यात आली आहे. अटक केल्यांनतर बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी रघुराम कृष्णा राजू कार्टात गेले. त्यानंतर कोर्टात एम. सुनील नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
आयपीएस सुनील नायक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. माजी खासदाराने आरोप केला होता की, ‘नायक यांनी कोठडीत जीवघेणा हल्ला केला. यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता‘, या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.



Comments