top of page

प्रधानमंत्री मोदींनी ‘मन की बात’ मध्ये उल्लेख केलेलं ‘सचेत अ‍ॅप’ काय आहे




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात च्या 121 व्या भागात भाषण दिले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सचेत अ‍ॅपचा उल्लेख केला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) लाँच केलेले आहे. हे अ‍ॅप नैसर्गिक आपत्तींपूर्वी लोकांना महिती देईल. पंतप्राधान मोदींनी सर्व देशवासीयांना हे अ‍ॅप वापरण्याचे आवाहन केले आहे आणि त्याचे फायदे देखील सांगितले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून भाषण दिले. पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याने त्याची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी इस्त्रोचे महान शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या संदर्भात, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केले की, प्रत्येकाने त्यांच्या फोनमध्ये ‘सचेत अ‍ॅप’ ठेवावे. गेल्या महिन्यात म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय बचाव पथकांनी ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत म्यानमार आणि थायलंडमध्ये ढिगार्‍यातून अनेक लोकांना वाचवले. नैसर्गीक आपत्ती टाळण्यासाठी, भारतात ‘सचेत अ‍ॅप’ लाँच करण्यात आले आहे.


प्रधानमंत्री मोदी म्हणाले

नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी तुमची दक्षता आणि सतर्कता आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या फोनमधील एका खास अ‍ॅपची मदत घेवू शकता. त्याचे नाव ‘सचेत अ‍ॅप’आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हे अ‍ॅप तयार केले आहे.


संकटापासून सावध करेल

‘साचेत अ‍ॅप’ चे फायदे सांगताना मोदी म्हणाले की, ‘पूर, चक्रिवादळ, त्सुुनामी, जंगलातील आग, हिमस्खलन, वादळे आणि वीज कोसळण्यासारख्या आपत्तींपूर्वी ‘सचेत अ‍ॅप’ तुम्हाला महिती देईल. हे अ‍ॅप प्रादेशिक भाषांमध्ये देखील माहिती प्रदान करते.’


हवामान संबंधी माहिती

हवामानाशी संबंधित माहिती ‘सचेत अ‍ॅप’ द्वारे देखील माहिती मिळू शकते. हवामान खात्याचे सर्व प्रमुख अपडेट्स या अ‍ॅपमध्ये उपलब्ध असतील. पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासीयांना या अ‍ॅपचा वापर करण्याचे आणि त्यांना मिळालेला, अनुभव आमच्यासोबत शेअर करण्याचे अवाहन केले आहे.

‘सचेत अ‍ॅप’ म्हणजे काय?

‘सचेत अ‍ॅप’ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लाँच केले आहे . या अ‍ॅपवर, वापरकर्त्याला त्याच्या सध्याच्या स्थानाच्या आधारे अलर्ट मिळतात. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना तुमच्या राज्यात आणि जिल्ह्यात होणार्‍या नैसर्गिक आपत्तींबद्दल माहिती देते. यासोबतच, भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) नवीनतम हवामान अपडेट्स देखील त्यावर उपलब्ध आहेत.

Comments


bottom of page