top of page

प्रधानमंत्री मोदी सौदीच्या हवाई हद्दीत पोहोचताच, एफ-15 लढाऊ विमानांची सुरक्षितता!




पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सौदी अरबियाच्या दौर्‍यासाठी रवाना झाले. यादरम्यान, जेव्हा प्रधानमंत्री मोदींचे विमान सौदी अरबियाच्या हवाई हद्दीत पोहोचले तेव्हा तेथील एफ-15 लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला सुरक्षा प्रदान केली. भारत आणि सौदी अरबियामधील संरक्षण संबंध मजबूत होत असल्याचे दर्शविणारा हा एक विशेष सन्मान म्हणून पाहिला जात होता.

परराष्ट्र मंत्रालयाने शेअर केला व्हीडिओ

या प्रकरणाची माहिती देताना, परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या विमानाला सुरक्षा पुरवणार्‍या सौदी लढाऊ विमानांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर रवाना होत असताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केले. त्यांचे विशेष विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच, रॉयल सौदी एअर फोर्सच्या एफ-15 लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाचे संरक्षण केले. रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असे म्हटले की, हा उपक्रम भारत आणि सौदी अरेबियामधील वाढत्या मैत्रीचे आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्याचे प्रतीक मानला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या क्षणाचा एक व्हिडिओ जारी केला आहे. जो दोन्ही देशामधील खोल विश्वास दर्शवितो.



पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी क्राउन प्रिन्सला भेटतील !

सौदीला पोहोचताच पंतप्रधान मोदी मंगळावारी संध्याकाळी सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना भेटतील. या काळात, दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण सहार्य वाढवण्याबरोबरच इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदींच्या या भेटीला भारत आणि सौदी अरेबियामधील वाढत्या धोरणात्मक संबंधासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे.


सौदीला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले.

सौदी अरेबियाला रवाना होण्यापूर्वी एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यात भारत आणि सौदी अरेबिया दोघांचेही समान हित आहे. त्यांनी सौदी अरेबियाचे वर्णन ‘भारताचा विश्वासू मित्र, सागरी शेजारी आणि धोरणात्मक भागीदार’ असे केले.


दोन्ही देशांमधील संरक्षण सहार्यावर भर !

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही सौदी अरेबियाला या प्रदेशात स्थिरता सकारात्मकतेची शक्ती मानतो. दोन्ही देशामंमधील संरक्षण आणि सुरक्षा सहार्यातील वाढ हे परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. यासोबतच, त्यांनी सांगितले की, ही भागीदारी उद्योन्मुख प्रादेशिक अव्हानांना तोंड देण्यासाठी आणि स्थिरता राखण्यासाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेचा पुरावा आहे.

 
 
 

Comments


bottom of page