top of page

प्रफुल्ल पटेल, तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता , अजितदादांच्या घरासमोर काळी जादू त्यासाठीच! - रोहित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. रोहिती पवार म्हणाले की,अजित पवारांच्या निधनानंतर (28 जानेवारी2026) अवघ्या 18 व्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक अयोगाला एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना (प्रफुल्ल पटेल) देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्याव राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक अयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहरा ग्राह्य धरु नये, अशी विनंती केली आहे.


दरम्यान काही दिवसापूर्वी अजितदाद पक्षाची कागदपत्रे समोर आली. हा कागद 10 मार्च 2026 चा आहे, यामध्ये सुनेत्राकाकी यांचे एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात 28 जानेवारी 2026 ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जो पत्रव्यवहार निवडणूूक अयोगाला केला जाईल ता ग्राह्य धरू नये.उ 26 फेब्रवारीला एक पत्र अजितदादा पक्षाकडून निवडणूक अयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्या आहेत, ज्यामध्ये लिहिलं होतं की, आमचा पक्षाचा काँस्टिट्यूटशन बदलला आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नेशनल वर्किंग प्रेसिंडेंटकडे (कार्यकारी अधक्ष) ताकद असेल असा या पत्रात म्हटलं गेलं होतं. सर्व निर्णय हे ते घतील असा या पत्रात म्हटलं आहे. कोण होतं नेशनल वर्किंग प्रेसिडेट? प्रफुल्ल पटेल होते. यामध्ये सर्व अधकिर वर्किंग प्रेसिंडेन्ट यांच्याकडे असवो असा या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेता काकींना कळल्यावर सुनेता काकींनी आयोगाला पत्र दिलं. राष्ट्रीय अध्यक्ष होइपर्यंत कोणताही पत्र विचारात घेऊ नये असंही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.


रोहित पवार पुढे बालेताना म्हणाले की, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही असं मला वाटत माझं जयशी बोलणं झालं नाही. व्हिएसआर कंपनीला वाचविण्याचं काम सुरू आहे या कंपनीला अपघातानंतर सुद्धा 80 ते 90 कोटी रुपये दिले. राहुल गांधी यांची मी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितले जिथे तुला न्या मिळेल त्या राज्यात तुझी एफआयआर कर त्यामुळे आम्ही कर्नाटकात गेलो आणि तिथे झिरो एफआयअर झाला, अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.


पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचे दिलेले विधान आणि त्यानंतर त्यांनी ते ‘ चुकीचे बोललो’ असे सांगणे, हा घटनाक्रम संशयास्पद वाटतो, पण आधीच नेत्यामध्ये ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती. सुनेता काकींना सांगायचं आहे, राजकारण लय वंगळ झालं आहे, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होत की, अधिवेशनात कोणीही अजित पवार यांच्या अपघाताबद्दल बोलायचं नाही, म्हणून काही आमदार सोडले तर कोणीही सभागृहात याबाबत बोलत नव्हते.जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होत त्याचं काय झालं. त्याने पण पत्रकार परिषद घेतली नाही.


हा संपूर्ण कट अधीच रचला गेला होता का आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे सर्व घडवून आणले गेले का, याचा तपास करण्यासाठी या प्रकरणाची ‘ क्रिमिनल हन्व्हेस्टिगेशन ’ (गुन्हेगारी तपास) व्हावा, अशी मागणी रोहित पवारांनी यावेळी केली. रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेद्वारे प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर थेट निशाना साधला आहेे.

अजित दादा जिवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ‘ब्लॅक मॅजिक’ (काळी जादू) किंवा संशयास्पद पूजा करण्याचा प्रयत्न झाला होता. यात नाशिकच्या भोंदू बाबाचा समावेश असावा, असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठीच हा प्रकार केला गेला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 28 जानेवारी रोजी अजित पवारांचा झज्ञलेला अपघात हा खरोखरच अपघात होता की घातपात, याची चर्चा आणि तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

Comments


bottom of page