top of page

फडणवीस सरकारचा तो निर्णय ; आमदार रोहित पवार यांना होम ग्राऊंडवरच धोबीपिछाड




राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची होमग्राऊंडवरच धोबीपछाड झाली आहे. कर्जत नगर पंचायतीच्या अध्यक्षा उषा राऊत यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कर्जतमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आत पूर्णविराम मिळाला आहे.


कर्जत नगरपंचायतीमधील 13 नगरसेवकांनी उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अनुषंगाने आज विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र, सभेच्या आधीच उशीरा राऊत यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकउे सुपूर्द केला आहे.

कर्जत येथील नगरपंचायत मध्ये आमदार रोहित पवार यांची एक हाती सत्ता होती. त्याला सुरूंग लावण्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना यश आले आहे.


राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 13 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवकांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. त्या अनुषंगाने आज कर्जत येथे विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र, विशेष सभा सुरू होण्या आधिच सकाळी गराध्यक्षा उषा राऊत यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून एका ओबीसी महिलेच्या विरोधात राजकारण केल्याचा आरोप राऊत यांनी केला.

पक्षीय बलाबल

कर्जत नगरपंचायत मध्ये एकून 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी 13 नगरसेवकांनी विश्वास ठराव मांडला होता.या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष (12) भाजप (2)आणि काँग्रेस (3) या पक्षांच्या नगरसेवकांचा पाठिंबा दिला आहे. या सर्व नगरसेवकांचं आज नगरपंचायत मध्ये विशेष सभा घेण्यात आली होती.वरिष्ठांची बैठक करूनही कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही अविश्वास ठराव आनल्याचे गटनेते संतोष म्हेत्रे म्हणाले. उषा राऊत यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.


नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावरील अविश्वासाचा ठराव 13 नगरसेवकांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे दाखल केला होता. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने आज अविश्वास ठरावाची विशेष सभा बोलवण्यात आली होती. ती सभा सुरू होण्या आधी नगराध्यक्षा उषा राऊत यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनाम दिल्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी सांगितलं.

रोहित पवारांची धोबीपिछाड, राम शिंदेची सरशी

हा राजीनामा केवळ स्थानिक पातळीवरील असंतोषाचा परिणाम नसून यामागे मोठा राजकीय संघर्ष असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील संघर्षामुळे ही स्थिती निर्माणझाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.


फडणवीस सरकारचा तो निर्णय

काही दिवासांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक निर्णय मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार नगराध्यक्षांविरोधात नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणल्यास जिल्हाधिकार्‍यांना त्यावर कार्यवाही करण्याची मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता पहिल्यांदाच सत्ता बदल हा कर्जत नगरपंचायतीमध्ये झाला आहे.

Comments


bottom of page