फडणवीस सरकार पाण्यात गेलं, एकाच पावसात मुंबई तुडूंब !
- Navnath Yewale
- May 26
- 2 min read

मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पुढील 3-4 तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी 50- 60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“ राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरश: पाण्यात गेलं आहे शब्दश: आणि कार्यक्षमतेनेही” असं म्हणत पटोले यांनी टिकास्त्र सोडलं आहे. “महायुती सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. फक्त एका पावसातच मुंबई बुडते. कोट्यावधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही” नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “ निसर्गाचा इशारा, सरकारच्या बेशिस्त कारभार ! राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरश: पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसांच नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वत:च सरकारला सावध करत आहे”
“ अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, धान आणि फळबागांचे भयानक नुकसान झालं आहे. मात्र, सरकारकडून फक्त आकडेवारी वाचली जाते, मदतीचा एक थेंबही शेतकर्यांच्या डोळ्यांतले अश्रू थोपवून शकलेला नाही. मागच्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई अजूनही हवेत लोंबकळतेय, आणि शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेतकर्याला निवडणुकांच्या वेळी “राजा” म्हणणारेच आज त्याच्या दु:खाकडे पाठ फिरवत आहेत. आणि म्हणूनच, मंत्रालय पाण्याखाली जाणं ही नुसती नैसर्गिक आपत्ती नाही - ती एक चेतावणी आहे”
फक्त एका पावसात मुंबई बुडते:
“महायुती सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यावधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही. रस्ते चांगले करू शकत नाहीत. ड्रेनेज सिस्टिम सुधारू शकत नाही. नद्यांमधील कचरा काढण्याच्या बहाण्याने कोट्यावधी रूपये लुुटले जातात हे विदारक दृश्य आहे. गेल्या चार पर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणूका सरकाने घेतल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाला सरकारला चार मिन्यात निवडणूका घ्यायला सांगावे लागते. पण या सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाही. प्रशासक आणि सरकारच्या माध्यमातून जनेतेची लूट सुरू आहे”.
सरकारला जनतेशी काही देणंघणं नाही
“ अजित पवार अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री होते. तरीही शहरात असा पूर येतो की नद्या रस्त्यांवरून वाहतात? हे निष्काळजी नियोजन नाही, तर बिल्डर लॉबीसोबतच्या संगनमताचं फलित आहे. सरकारला जनतेशी काही देणंघेणं नाही. यामुळेच आज राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पहायला मिळत आहे. आज एकीकडे पुराने राज्याला वेढले आहे, एकीकडे शेतकर्यांची पिके उद्धवस्त झाली आहे आणि दुसरीकडे अमित शहांच्या दौर्याची जय्यत तयारी नांदेड मध्ये सुरू आहे. याचाच अर्थ यांना जनतेच्या मतावर ऐशोआराम करायचा आहे”
“ राहूलजींनी ज्याप्रमाणे ओबीसी समुदायाबद्दल आणि जातीनिहाय जनगणनेबद्दल भूमिका मांडली ती या देशात ती शस ती या देशात कुणीही मांडलेली नाही. ओबीसी समाजाचा खरा लढवय्या नेता राहूल गांधी आहेत. तेलंगणा राज्याने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना केली, त्या धर्तीवर संपूर्ण देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे”
ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे सुरक्षा का पुरवण्यात आली नाही?
“ आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाला सलाम करण्याऐवजी मीच युद्ध जिंकले आहे असे भागवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत. आपली पाठ आपल्या हाताने थोपटण्याच काम नरेंद्र मोदी करत आहेत. ज्या आमच्या भगिनींच कुंकू पुसण्याचं पाप आतंकवाद्यांनी केलं ते आतंकवादी कुठे आहेत? ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आहेत, म्हणून मिलिटरीचे कपडे घालून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटायची जी भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली आहे तिचा आम्ही निषेध करतो” असं नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Comentarios