बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक रणजीत कासले यांचे खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांना अवाहन, कारागृहात वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंटचा दावा !
- Navnath Yewale
- May 25
- 2 min read

बीडचे बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक रणजीत कासले यांनी पुन्हा जामिन मिळाल्यानंतर पुन्हा सोशल मिडियावर व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक आरोप केले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसाठी बीडचे सब जेल ‘स्वर्ग’ असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक रंणजीत कासले यांनाही सुरवातील बीडच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इतर कारागृहात हलवण्यात आले. रणजीत कासले सध्या जामिनावर आहेत.
बीडच्या गुन्हेगारी जगताबाबत बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक रणजीत कासले यांनी यापूर्वीही सोशल मिडियावर व्हिडिओ व्हारयल करत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रणजीत कासले यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात रणजित कासले यास पुणे स्वारगेट येथून बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असता मा. न्यायालयाने कासले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, रणजित कासले सध्या जामिनावर बाहेर आहेत. शनिवारी रणजीत कासले यांनी पुन्हा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्तेतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यास कारागृहात मिळणार्या व्हिआयपी ट्रिटमेंटसह आनेक धक्कादायक दावे रणजीत कासले यांनी केले आहेत. वाल्मिक कराड यास तुरुंगात स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वत: सह तो इतर कैद्यांच्या नावावर 25 हजारांची खरेदी कारागृहातील कँटीनमधून करत असल्याचा आरोप कासले यांनी केला आहे. रणजी कासले यास सुरवातीला बीड कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथे वाल्मिक कराडला इतर कैद्यांपेक्षा व्हिआयपी वागणूक मिळत आहे. त्याला कपातून स्पेशल चहा दिला जातो. त्याच्यासाठी चांगल्या दर्जाच्या (तिन लेअर) चपात्याही तयार केल्या जात आहेत. इतर कैद्यांना केवळ पांघरण्यासाठी कपडे दिले जातात. तर कराडला पांघरण्याचेच 6 ब्लँकेट मिळाले असून त्याचा वापर तो गादीसारखा करतो. इतर कैद्यांच्या नावावरही 10 ते 15 हजार अशी सुमारे 25 हजारांची खरेदी करतो, मी कारागृहात राहून कराडला मिळणारी व्हिआयपी वागणूक समोर आणेल, या भतीपोटी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच मला सुरक्षेचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले होते.
कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपण कारागृहातून अर्जाद्वारे केली होती. दरम्यान, मी कारागृहात गेल्यानंतर वाल्मिक कराड बाबत चौकशी केली असता कराडने सब जेलरला बोलावून घेतलं आणि म्हणाला ‘हा कासले इथपण उद्योग करायला लागला त्याला हलवा’ मग मला सुरक्षेचे कारण देत संभाजीनगर कारागृहात हालवले. मला करागृहात काय धोका आहे, बाहेर असताना ज्यावेळेस धोका होता त्यावेळीस मला सुरक्षा पुरविली नाही आणि आत कारागृहात गेल्यावर माझ्यावर कोण हल्ला करणार? केवळ कराडच्या सांगण्यावरून मला इतरत्र हलवण्यात आले.
सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानिया, करुणा मुंडे, तृप्ती देसाई यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार यांना विनंती आहे वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवू नये त्याच्या जिवाला धोका आहे. मागे कोणीतरी तसा अर्ज केला होता त्यावर जबाबदार प्रशासनाने हास्यास्पद उत्तर देत कराडला आठवड्यातून मा. न्यायालयात हजर करावे लागते असे कारण दिले. प्रत्यक्षात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेही आरोपीला हजर करता येते. मलाही व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारेच हजर केले होते.
कराडला कारागृहात शाही वागणूक दिली जाते त्याला वाचायला पाच पेपर येतात यामध्ये महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत, सकाळ आणि एक स्थानिक दैनिकाचा समावेश आहे. वाल्मिक कराडला अशा करागृहात हलवा जिथे आपीएस दर्जाचा तुरुंग अधिकारी आहे, मग पहा त्याला कळेल जेल काय असंही कासले म्हणाले. दरम्यान ,कासले यांच्या आरोपाने पुन्हा खळबळ उडाली असून आमदार धनंजय मुंडे यांचे नाव घेत कासले म्हणाले की, आमदार धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यास शब्द दिला आहे की, “ही केस चार पाच वर्षे चालेल मी तुल इथून हलवू देणार नाही.” दरम्यान, बीड कारागृह वाल्मिक कराडसाठी स्वर्ग असल्याचा खळबळजनक दावाही कासले यांनी केला आहे. बिहारच्या चंपारान्यामधून लाईव्ह येत हा व्हिडिओ करत असल्याचेही कासले म्हणाले.
Comments