top of page

बहूतांश राज्यात मुसळधार पावसाचा इशारा !



जूनच्या पहिल्या दिवशी राजधानी उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आज हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. वार्‍यांचा वेग ताशी 40-50 किमी असू शकतो असा अंदाज आहे. गेल्या देान-ती दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे दिल्लीकरांना उष्णता आणि आर्द्रतेपासून तात्काळ दिलासा मिळाला आहे आणि हा दिलासा आजही कायम राहण्याची अपेक्षा आहे.


महाराष्ट्रात अजूनही ऑरेंज अलर्ट

राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचाा इशारा देण्यात आला आहे. अलवर, कोटा, उदयपूर, भरतपूर, बुंदी, आणि बारमेर येथे पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर हिमाचल, काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडेल. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये अजूनही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

आज राजधानीचे कमाल तापमाण 37 अशं आणि किमान तापमान 29 अंश असू शकते. परंतु 4 जूनपासून पुन्हा एकदा वादळ आणि पावसाचा कालावधी सुरू होईल. यासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. परंतु आजपासून 4 जूनपर्यंत राजधानीत हलक्या पावसाचा कालावधी सुरू राहील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून युपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. आज लखनऊ, हरदोई, गोंडा, रायबरेली, बलरामपूर, श्रावस्ती, बहराइच,लखीमपूर खेरी, सीतापूर, कानपूर, दहात, कानपूर नगर, बाराबंकी, फैजाबाद, प्रतापगड येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.


Comments


bottom of page