बांगलादेशाच्या माजी पंतप्रधानांस 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा!
- Navnath Yewale
- 7 days ago
- 1 min read

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना न्यायालयाच्या अवमाना केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकारणाने ही शिक्षा जाहिर केली आहे. बुधवारी (2 जूलै) 3 सदस्यीय खंडपीठाने हा निकाला दिला. बांगलादेशी माध्यमांनुसार,अंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकारणाच्या खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तझा मजुमदार होते. कोणत्याही प्रकरणात शेख हसीना यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, मिडिया रिपोर्ट नुसार, गेल्या वर्षी शेख हसीना यांची एक ऑडिओ क्लिप लीक झाली होती. ही ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर, बांगलादेशी महाध्यमांनी ती प्रसारीत केली. या ऑडिओ क्लिपमध्ये शेख हसीना गोविंदगंज उपजिल्हा अध्यक्ष शकील बुलबुल यांच्याशी बोलत होत्या, ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘माझ्यावर 227 गुन्हे दाखल आहेत, म्हणून मला 227 लोकांना मारण्याचा परवाना मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने न्यायालयाचा अवमना केल्या प्रकरणी शकील बुलबुल यांनाही 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याची ही पहिलीच वेळ आहे.
Comments