बारामती माळेगाव कारखाना निवडणूक; दस्तुरखुद्द अजित पवार निवडणूकीच्या रिंगणात
- Navnath Yewale
- May 28
- 1 min read

बारामतीच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्या माळेगाव सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूकीच्या रिंगणात दस्तुरखुद्द अजित पवार उतरले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून,त्यांच्या पॅनेलविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचेही पॅनेल निवडणूक लढविणार आहेत. यामुळे अजित पवार यांच्यासमोर कडवे अव्हान उभे राहिल आहे. अजित पवार उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार, यावर या निवडणूकींची रंगत अवलंबून आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिनिधीमार्फत अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर मेळावा घेत या कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले होते. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी दोन वेळा या कारखान्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारणन्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने माघार घेतली होती. मात्र, या कारखान्याच्या निवडणूकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच, कष्टकरी, शेतकरी समितीचेही पॅनेल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निमित्ताने बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अर्ज माघारीकडे लक्ष:
या निवडणूकीसाठी दाखल झालेल्या 593 उमेदवारी अर्जांची 28 मे रोजी छाननी होणार आहे. 29 मे ते 12 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. या कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याकडे लक्ष असणार आहे. 13 जून रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणूकीसाठी कोणाला संधी मिळणार आणि किती पॅनेल असणार हे स्पष्ट होणार आहे.
댓글