बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेवरच मला विश्वास - विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी
- Navnath Yewale
- Apr 9
- 1 min read

मी बाळासाहेब आंबेडकरांच्या बोलण्याने समाधानी आहे, ते जी भूमिका घेतील त्यावर मी समाधानी आहे, मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांनी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केली आहे, त्याची सुनावणी काल औरंगाबाद खंडपीठात पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली.
शहीद सोमनाथ सुर्यवंशीच्या पोलीस कोठडीतील हत्येनंतर प्रकाश आंबेडकर हे लढतांना दिसताय. सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला सर्व राजकीय पक्षांनी भेटी दिल्या. आश्वासने दिली मात्र, लढाईच्या वेळी कोणीही प्रत्यक्षात हजर नव्हते. फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत, म्हणून आम्हाला आधार आहे, तेच आम्हाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
Comments