top of page

बिअरबारमध्ये बसून सरकारी काम करणार्‍या अधिकार्‍याचे निलंबन

मुख्यमंत्र्याचे निलंबनाचे आदेश; तातडीने अंमलबजावणी


ree

नागपूर; उपराजाधानी नागपूरमध्ये बिअरबारमध्ये बसून सरकारी काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बिअर बारमध्ये बसून महारज्ञश्ट्र शासन लिहिलेल्या फाईल क्लिअर करण्याचे काम सुरु असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.


नागपूरमधील बिअरबारमध्ये सुरू असलेल्या कारभाराची राज्यभरात चर्चा झाली. बारमध्ये बसून सरकारी अधिकार्‍याने शासकीय फाईल दाखल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला होता. बारमध्ये दारूचे घोट रिचवत सरकारी काम होत असल्याचे उघड झाले होते. याच प्रकारचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला.


सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये टेबलवर तिघेजण बसलेले दिसतात. या टेबलावर महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्स दिसतात. या फाईली पाहताना ते काय काम करत होते, याविषयी चर्चा सुरू झाली. हे अधिकारी गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीत समोर आलेल्या महितीनुसार देवानंद सोनटक्के या अधिकार्‍याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देवानंद सोनटक्के यांचे झाल्याची माहिती आहे.

Comments


bottom of page