top of page

बिथरलेल्या पाकिस्ताकडून शस्त्रबंदीचे उल्लंघन; सीमरा रेषेवर गोळीबार

भारताकडून चोख प्रत्युत्तर, लष्कराचे दोन जवान शहिद


शस्त्रबंदीचे उल्लंघन करत बिथरलेल्या पाकिस्तानने शनिवारी रात्री जम्मु काश्मीरसह सीमारेषेवर गोळीबार केला. भारतीय लष्काराकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जम्मु काश्मीरसह राजस्थान, पंजाबच्या सीमारेषेवरील महत्वाच्या शहरात ब्लॅक आऊट करण्यात आला होता. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफचे जवान इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज शहीद झाले, तर जम्मु काश्मीरच्या उधमपुरमध्ये तैनात असलेले आयएएफचे वैद्यकिय सहाय्यक सुरेंद्र कुमार मोगा यांना विरमरण आले.



भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच वाढला. बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय सुरक्षा दलाने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.


जम्मू प्रदेशात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये मागील 24 तासांत लष्कराने दोन जवान गमावले. यामध्ये भारतीय हवाई दलाचे एक जवान आणि सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) एक सब-इन्स्पेक्टर शहीद झाला आणि त्यांच्या युनिटमधील 7 जण जखमी झाले. हिमाचलचे जेसीओ सुभेदार मेजर पवन कुमार यांचे शनिवारी सकाळी पूंछच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये त्यांच्या चौकीजवळ गोळीबारात निधन झाले.


आरएसपुरा सेक्टरमध्ये रात्रीच्या गोळीबारात जम्मू काश्मीर लाईट इंन्फंट्रीचे 25 वर्षीय राफलमन सुनील कुमार यांचे निधन झाले. आयएएफच्या 36 विंगमध्ये कार्यरत असलेले 36 वर्षीय वैद्यकिय सहाय्यक सार्जंट सुरेंद्र कुमार मोगा हे जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये तैनात असताना पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झाले. मूळचे बेंगळूरूमध्ये तैनात असलेले, वाढत्या तणावामुळे त्यांना चार दिवसांपूर्वीच उधमपूर येथे पुन्हा तैनात करण्यात आले होते.


राज्यस्थानच्या झुंझुनूच्या मेरादासी गावातील मोगाच्या कुटुंबाला शनिवारी माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची 65 वर्षीय आई नानू देवी, पत्नी सीमा आणि दोन मुले आहेत. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.


आरएसपुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ युनिवटवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात उपनिरिक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद झाले. “ ते आणि इतर सात जण जखमी झाले. इम्तियाजचा मृत्यू झाला, तर इतरांची प्रकृती स्थिर आहे अणि त्यांना आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comentários


bottom of page