top of page

बिनविरोध निवडी विराधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली मनसेचे अविनाश जाधव यांना धक्का

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकींच्या मतदान प्रक्रियेेला अवघे काही तास उरले आहेत. मतदानापूर्वीच महापालिकांमध्ये 60 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान या बिनविरोध निवडीला अविाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात अव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, आज मा. न्यायालयाने अविनाश जाधव यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे

दरम्यान वकील असीम सरोदे यांनी सकाळी कोर्टासमोर सादर करताना आज सुनावणीसाठी घेण्यात आलेल्या याचिकांशी सबंधित याचिका आहे, असं म्हटलं होतं.


मात्र प्रत्यक्षात सुनावणीसाठी प्रकरण आल्यावर मात्र त्यांनी आधीच्या याचिकांशी सबंधित नाही पण निवडणुकीशी सबंधित असल्याचं विधान केलं. त्यावर न्यायमुर्तींनी आक्षेप घेत ‘ तुम्ही कोर्टासमोर अशी चुकीची विधाने कशी काय करू शकता’ असे म्हणत याचिका फेटाळली. चुकीची विधानं केल्याबद्दल आम्ही आपल्याला दंड आकारत आहोत, असं कोर्टाने म्हटलं. अविनाश जाधव, समीर गांधी यांनी ही याचिका सादर केली होती. केडीएमसी आणि ठाणे या महापालिका क्षेत्रात उमेदवर मोठया संख्येने बिनविरोध निवडून आलेले आहेत.


दरम्यान बिनविरोध निवडीसंदर्भात निवडणुक निर्णय अधिकार्‍यांवर संशय व्यक्त करत अविनाश जाधव यांच्यासह इतरांनी ही याचिका दाखल केली होती. अविनाश जाधव यांच्या वतिने वकील असीम सरोदे यांनी व्हिसीद्वारे युक्तीवाद केला. याशिवाय इतरही बर्‍याच याचिका मा. उच्च न्यायालयात दाखल असून त्यावर तातडीच्या सुनावणीस कोर्टाने नकार दिला आहे.


याचिका फेटाळून दंड आकारला

दरम्यान याचिका सादर करताना वकील असिम सरोदे यांनी “आम्ही निवडणुकीला विरोध करत नाही आहोत. पण बिनविरोध निवड हे जे काही होतय त्याला आमचा विरोध आहे” असा युक्तिवा केला. त्यावर कार्टाने म्हटले की, “ तुम्ही चुकीची वक्तव्य करत आहात. चुकीच्या मुद्यांवर तुमचा युक्तिवाद आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही दंड आकारतोय आणि ही याचिका फेटाळतोय” अशा शब्दात कोर्टाने असिम सरोदे यांना सुनावलं.

Comments


bottom of page