top of page

बीडच्या वडवणीमधील महिला डॉक्टरची सातार्‍याच्या फलटणमध्ये आत्महत्या

नऊ महिण्यांपासनू छळ, पीएसआयकडून चार वेळा अत्याचार

ree

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये सुसाईड केल्याची घटना समोर आली आहे. मयत महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. पीएस आय गोपाल बदने व बनकर नामक व्यक्तीच्या माणसिक व शाररिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.


महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पालिस अधिकार्‍याला तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिने हातावर लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. शिवाय पीएसआय गोपाल बदने याने पाच महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्यांचही तिने याच नोटमध्ये नमुद केलंय दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करत दोघांना निलंबित केलं आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन्ही पोलिस अधिकार्‍यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


दोन पोलिस अधिकार्‍यांकडून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा छळ:

नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, पीएसआय गोपाल बदनेनी तिचं पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक त्रासाला कंटाळून तिने हॉटेलमध्ये जाऊन सुसाईड केली, आता पोस्टमार्टिम होईल, त्यात आणखी गोष्टी समोर येतीलच, मात्र तिने हातावर लिहीलेल्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. आता ही घटना समोर आल्यानंतर यासंदर्भातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.


चौकशीदरम्यान त्याने आपल्या वरिष्ठांना आणि सोबतच डीवायएसपींना लेखी स्वरुपात तक्रार देत म्हटले होते की, “ माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करेन” त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणाची नोंद फलटण पोलीस ठाण्यात आली असून त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. पोलिस मात्र यावर काही बोलायला तयार नाही. आत्महत्येपूर्वी या तिच्यावर फलटण पोलिसांकडून सातत्याने दबाव आणला जात होता. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तिच्या तक्रारीनंतर पोलिस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप नातेवाईक करत आहेत. आता चौकशीचे आदेश दिले जातील, राजकारण होईल, मात्र गेलेला जीव परत येणार नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Comments


bottom of page