बीडजिल्हा स्वयंपूर्तीने बंद : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
- Navnath Yewale
- Jan 28
- 1 min read

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार याचे आज दि.28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच बीड शहरातील व्यापार्यांनी स्वयंपूर्तीने आपली अस्थापने बंद ठेवून दुखवटा पाळला. शहरातील चौका चौकात पालकमंत्री अजित दादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महराष्ट्रात शोककळा पसरली. जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचारसभेसाठी अजित पवार बारामती दौर्यावर होते. सकाळी 8:15 च्या सुमारास मुंबई विमानतळावरुन त्याच्या विमानाने बारामतीच्या दिशेने टेकॉप केले. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान 8:47 वाजता त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पालकमंत्री अजित पवारयांच्या निधनाची वार्ता कळताच जिल्हाभरात शोक पसरला. बीडसह गेवराई, माजलगाव, आंबाजोगाई, परळी, केज, धारुर, पाटोदा, आष्टी, शिरुर कासार, वडवणी शहरांसह ग्रामीण भागातील व्यापारी व्यवसायीकांनी स्वयंपूर्तीने आप-आपल्या अस्थापना, व्यवहार बंद ठेवून पालकमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

सर्वपक्षीय श्रद्धांजली: अजित दादा पवार यांच्या निधनामुळे राज्याचे कधी न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. बीडचे पालकमंत्री अजित दादा यांना जिल्हाभरात चौका-चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली.
वाढदिवसाचे होर्डिंग तात्काळ उतरवले : भाजप आमदार सुरेश धस यांचा दि.2 फेब्रूवारी रोजी वाढदिवस असल्याने जिल्हाभरात कार्यकर्ते चाहत्यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त शुभे÷च्छा होर्डिंग लावण्यात आले होते. शिरुर कासार, पाटोदा, आष्टी शहरात सर्वत्र लावण्यात आलेले होर्डिंग अजित पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच अवघ्या काही तासांत उतरवण्यात आले. त्याच बरोबर आमदार सुरेश यांनी फेसबुक प्लॅटफॉर्मवरून जड अंत:करणाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत वाढदिवसा निमित्त सर्व कार्यक्रम स्थागित करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.



Comments