top of page

बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे का?; दोन दिवसात तीन अपहरण, गावठी कट्टा, खूनाचा प्रयत्न केल्याच्या घटना

Updated: May 18

परळीत पुन्हा गुंडाराज; दहाजणांची रिंगण करून एकास जबर मारहान

सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या,दोन अल्पवयीन तिघे फरार


किरकोळ कारणावरुन एकाचे अपहरण करून डोंगरात नेऊन दहा जणांनी रिंगण करून लोखंडी रॉड, कत्ती, लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ऐन वेळी इतर दोघांनी हस्तक्षेप केल्याने जीव वाचल्याचे पिडीत तरुणाने सांगितले. मारहाण करणारे आरोपी सुतोष देशमुख टू करण्याची धमकी देत मारहाण केल्याचे फिर्यादी तरुणाने म्हटले आहे. त्यामुळ बीडच्या परळीत कायद्याचं राज्य आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मराहाण करण्यात आली. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याला डोंगराच्या भागात नेले अणि लोखंडी सळई, बांबू, लठ्या काठ्याने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे गंभीर जखमी झाला आहे. उपचारार्थ शिवराज दिवटे यास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



या सर्व प्रकारानंतर शिवराज दिवटे याने शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्याला लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण केल्याचे सांगितले. तसेच टोळक्यातील काहीजन, याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा’ असे म्हणत असल्याचेही शिवराजने सांगितले.


जलालपूर येथे साप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो. जेवणांनंतर तिथे काही भांडण लागले होते तिथे मी भांडण पाहयला उभा होतो. त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो, हे कारणार्‍यांना माहिती होते. पेट्रोल पंपाजवळ तर पाच गाड्यावरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोृंगरावर घेऊन गेले. मला मारहाण करताना ते बोलत होते की, याला सोडायचे नाही याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा ते मला मारूण टाकत होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.



दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंंत राहत नव्हतो. लोखंडाची रॉड, कत्ती, लाकूड यांनी मला मारहाण केली. माझ्या डोक्यात बाटली देखील मारण्यात आली, पण ती फूटली नाही. सर्व आरोपी गांजा प्यायले होते, असे शिवराज दिवटे याने सांगितले. दरम्यान, शिवराज दिवटे याच्या फिर्यादीवरून परळी पोलिस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात अपहरण, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यातील सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून सातपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.




परळी हा दहशतवादाचा अड्डा: अंजली दमानिया

बीडचं परळी दहशतीचा अड्डा झाला आहे. यरंच याला गंभीरतेने घेतलं पाहिजे. काल जी मारहाण झाली त्यामध्ये सगळी मुलं 18 वर्षाची होती. या सगळ्या मुलांची मारहाण बघून,ज्याला मारलं त्याला पाया पडायला लावलं, त्यावरुन असं वाटतंय की, ही रिव्हेंज केस आहे. हे सगळं भलत्याचा दिशेने चाललंय. ऑपरेशन सिंदूरप्रमाणे बीडमध्ये एखादं ऑपरेशन राबलं पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.



पाच लाखाच्या खंडणीसाठी व्यापार्‍याचे अपहरण :


वाहनांची खरेदी-विक्री करणार्‍या व्यापार्‍याचे चौघांनी पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी संगणमत करूण अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना बीडच्या गिरामनगर येथे घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पंजाब पांडुरंग शिंदे वय 33 रा.गिरामनगर, पांगरी रोड बीड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश पोपट ठोसर, विठ्ठल गायकवाड हे दोघेही रा. उखंडा, लिंबादेवी, ता. बीड, बालाजी बहिरवाळ रा. धानोरा रोड बीड, मयुर खोमणे चर्‍हाटा फाटा, बीड अशी अपहरण करणार्‍या आरोपींची नावे आहेत. रात्री सव्वा नऊला घरी असताना दिनेश पोपट ठोसर, विठ्इल गायकवाड, बालाजी बहिरवाळ व मयूर खोमणे या चौघांनी घराबाहेर बोलावून लाथाबुक्यांनी मारहाण केली.


त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या काळ्या रंगाच्या स्विप्ट कारमध्ये बसवून त्यांना नगर रोडवरील देवराज बारमध्ये नेण्यात आले. तेथे आरोपींनी पाच लाख रुपयांची मागणी करत पुन्हा एकदा मारहाण केली. यावेळी बालाजी बहिरवाळ याने बीअरच्या बाटलीने शिंदे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. मारहाण झाल्यानंतर शिंदे यांनी जीव वाचवण्यासाठी अंधराचा फायदा धेत बारमधून पह काढला व जवळील स्टोन के्रशरवर लपून बसले.


काही वेळाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व शिवाजीगर पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी आरोपी दिनेश ठोसर, विठ्ल गायकवाड, बालाजी बहिरवाळ व मयूर खोमणे यांच्य विरोधात अपहरण, मारहाण, जबरदस्ती, खंडणी मागणी व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.



सिनेस्टाईल विद्यार्थ्याचे अपहरण आणि बेदम मारहाण


बीड येथून एसटी बसमधून प्रवास करणार्‍या विद्यार्थ्याचे अपहरण करून अमानुष मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरातील पाण्याची टाकी मोरेवाडी येथून समोर आली आहे. या प्रकरणी चार आरोपींविरूद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य एक जण फरार आहे.


बीड येथून अंबाजोगाईला जाणार्‍या बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरून एका महिलेशी वाद झाला. यानंतर ही बस अंबाजोगाई शहरातील पाण्याची टाकी मोरेवाडी याठिकाणी थांबली असता चार जणांनी बसमध्ये घुसत विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी वाहक व चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे न ऐकता या चौघांना खाली उतरवत मारहाण सुरूच ठेवली.


या मारहाणीत संदेश सावंत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एसआरटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याचा मित्र राहुल केंद्र याच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात ऋषी शिंदे, लखन जगदाळे, निकेश जगदाळे , बालाजी जगदाळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचार घेतल्यानंतर संदेश सावंत याने आपल्याला अंबाजोगाई शहरात वेगवेळ्या ठिकाणी घेऊन जात जबर माहरहाण केल्याचे म्हटले आहे. अंबाजोगाई शहर पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर एक आरोपी फरार आहे.


सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

विद्यार्थ्याना माहरण होत असल्याची मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. मोरेवाडी येथील पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपींनी मारहाण केल्याचे चित्रीकरण दिसून आले. दरम्यान बीड पोलिस मुख्यालयातून आरोपींचे लोकेशन प्राप्त होताच अंबाजोगाई पोलिसांच्या पथकाने अपहरण केलेल्या विद्यार्थ्यासह आरोपींना आडस परिसरतून ताब्यात घेतले.


परळीत गावठी कट्टा, काडतूस सह दोघे ताब्यात :


परळी रेल्वे स्थानक परिसरता दोन इसम येत असून त्याच्याजवळ अवैध गावठी कट्टा असल्याची माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली . प्राप्त माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी परळी रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावला. यावेळी आमोल रामहरी कांदे वय 32 वर्षे रा. माणिकनगर परळी, पांडुरंग प्रकाश शेंडगे वय 30 वर्षे रा. एलआसी कॉलनी, रिंगरोड लातूर यांना पकडले. त्या दोघांची झडती घेतली असता आरोपी अमोल कांदे याचे पॅन्टच्या आतमध्ये करमेला एक गावठी कट्टा खोवलेला मिळून आला.


तसेच त्यासोबत तिन जिवंत काडतूस देखील मिळून आले. दरम्यान या कारवाईत एक गाठी पिस्टल, व तीन जीवंत काडतूस असा एकून 43000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींची कसून चौकशी केली असता, सतीष मुंडे, रा. डाबी, ता. परळी, व मनोहर मुंडे रा. बेलंबा, ता. परळी यांच्याकडून विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात कबुल केले असून चाराही आरापींविरुद्ध संभाजीनगर (परळी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

Comments


bottom of page