top of page

बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा वॉर ! धनंजय देशमुख यांच्यावर बीड पोलिसात गंभीर गुन्हा; घटना घडलीच नसल्याचं पोलिस तपासत उघड

बीड: मस्साजोगचे दिवंगत सरपंच सांतेष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबजनक अरोप करण्यात आला. धनंजय देशमुख यांच्या विरोधात समाधान खिंडकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपाची चक्रे फिरवली असता अशी काही घटना घडलीच नसल्याचे समोर आल्याने दोन्ही बाजूंनी खोटे गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले आहे.


बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील मांजरीसुंबा शिवारातील एका हॉटेलमध्ये धनंजय देशमुख यांनी आपल्याला पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी दिली, असा खळबजनक आरोप समाधान खिंडकर यांनी केला होता. धनंजय देशमुख हे बीड मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाल्याने या प्रकरणाने देशरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी सध्या कारागृहात आहेत.धनंजय देशमुख यांच्याविरोधात समाधान खिंडकर याच्या दाखल फिर्यादीनुसार आता धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाचे पिस्तूल काढून माझ्या डोक्यावर ठेवले आणि मला धमकावले तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा अरोप केलेला आहे. खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा प्रयत्न केल्याचा अरोपात धनंजय देशमखु यांच्याविरुद्ध बीडमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. गुन्हादाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हॉटेलमधील सीसीसटीव्ही फुटेज/ डीव्हीआर जप्त करत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.


पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डिव्हीआर, साक्षिदारांच्या जबाबांची तपासणी केली असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. या नंतर धनंजय देशमुख यांनी देखील समाधान खिंडकर यानेच उलट धमकावल्याची तक्रार दिली होती. दोन्ही बाजूंच्या फिर्यादींनी जाणूनबुजून पोलिसांत खेाटी तक्रार दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून, खोट्या तक्रारी करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


दरम्यान आपण पोलिसांना रात्रीच शहानिशा करून पुढील कारवाई करा असे सांगितले होेते. मात्र, कुठली एवढी गडबड झाली होती माहित नाही. त्यांनी पहाटेच हा गुन्हा दाखल करून घेतला. मात्र आता तपासात असं काही घडलं नाही हे सर्व काही खोटं आहे हे निष्पंन्न झालं आहे असं धनंजय देशमुख म्हणाले.

Comments


bottom of page